Join us

मुकेश अंबानी व्हायचंय? मग १ कोटी ७४ लाख वर्षे काम करा!, काय आहे ही भानगड वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 07:06 IST

समजा तुम्ही भारतातले एक मध्यमवर्गीय नागरिक आहात आणि या देशातले सरासरी वेतन तुम्हाला मिळते.

समजा तुम्ही भारतातले एक मध्यमवर्गीय नागरिक आहात आणि या देशातले सरासरी वेतन तुम्हाला मिळते. तर या देशातले सर्वात श्रीमंत गृहस्थ मुकेश अंबानी यांच्याइतकी ऐपत प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फक्त १ कोटी ७४ लाख वर्षे काम करत राहावे लागेल!.. हेच गणित सर्वसामान्य, मध्यमवर्गीय अमेरिकन नागरिकांना लावायचे ठरवले, तर सर्वात श्रीमंत अमेरिकन इलॉन मस्क यांच्याइतकी ऐपत गाठण्यासाठी सामान्य अमेरिकन माणसाला साधारण ३० लाख वर्षे काम करावे लागेल! थक्क करायला लावणारे हे गणित जगाच्या विविध भागांमध्ये आर्थिक असमानतेचे एक चित्र समोर उभे करते. भारत आणि चीन या आशियाई देशांमध्ये ही असमानता सर्वाधिक आहे, हे सोबतच्या तक्त्यावरून अधिक स्पष्ट होईल !

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स