Join us

हवंय दहा कोटींचं घर! मुंबईत १० महिन्यांत ७२२ आलिशान घरांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:42 IST

दक्षिण मुंबई व मध्य मुंबईलाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चालू वर्षात मुंबईत एकीकडे घरांच्या विक्रीने एक लाखाचा टप्पा ओलांडला असतानाच आता आलिशान घरांच्या विक्रीतही मुंबईने नवा उच्चांक नोंदविला आहे. ज्या घरांची किंमत १० कोटी वा त्यापेक्षा अधिक आहे अशा तब्बल ७२२ घरांची विक्री गेल्या दहा महिन्यांत झाली आहे. विशेष म्हणजे, या घरांसाठी ग्राहकांनी दक्षिण मुंबई व मध्य मुंबईलाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.

एका सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. मुंबईतील नामवंत उद्योगपती, क्रिकेटपटू, बॉलिवूडमधील कलाकार यांनी या आलिशान घरांची खरेदी केली आहे. विक्री झालेल्या घरांचे किमान आकारमान १२०० चौरस फूट ते कमाल पाच हजार चौरस फुटांपर्यंत आहे. 

असा मिळाला भावn५३२ आलिशान घरांची विक्री २०२२ मध्ये झाली होती.n७० हजार रुपये चौरस फुटांपर्यंत कमाल दर आकारणी दक्षिण मुंबईतील घरांकरिता झाली आहे. 

टॅग्स :मुंबईसुंदर गृहनियोजन