घर खरेदीसाठी होमलोन घेतल्यास करसवलतीचा लाभ मिळतो. मात्र, हा लाभ फक्त को-ओनर (सह-मालक) असल्यानंतरच को-बॉरोअर (सह-कर्जदार) ला मिळणार आहे. केवळ कर्जदार म्हणून नाव असणे पुरेसे ठरणार नाही, असे आयकर कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
होमलोनच्या व्याज, मुद्दल परतफेडीवर आयकरात सवलत दिली जाते; परंतु यासाठी संबंधित व्यक्ती घराची सह-मालक असणे अनिवार्य आहे. अन्यथा सवलतीचा दावा करता येणार नाही. पाच वर्षांत घर विकल्यास सवलत पुन्हा उत्पन्नात जोडली जाते, त्यामुळे कर भरावा लागू शकतो.
को-बॉरोअरचे नियम काय? होमलोनवर करसवलत हवी असल्यास१. घराच्या मालकीत नाव असणे२. कर्ज परतफेडीत प्रत्यक्षसहभाग असणे३. कर्जाचा भार स्वतः उचललेला असणे.
किती मिळते करसवलत? जर को-बॉरोअर को-ओनरही असेल, तर तो स्वतःच्या उत्पन्नाच्या प्रमाणात करसवलतीचा लाभ घेऊ शकतो. दोन सह-मालक असल्यास, दोघेही स्वतंत्रपणे व्याज व मुद्दलावर सवलत घेऊ शकतात.मुद्दल परतफेडीवर सवलत : लोनच्या मुद्दल परतफेडीवर कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते.
Web Summary : Home loan tax benefits require co-ownership, not just co-borrowing status. Co-owners can claim tax deductions on interest and principal repayment proportionally. Selling within five years reverses benefits. Key conditions include ownership, repayment participation, and bearing the loan burden.
Web Summary : होम लोन पर कर छूट के लिए सह-स्वामित्व जरूरी है, केवल सह-उधारकर्ता होना पर्याप्त नहीं है। सह-मालिक ब्याज और मूलधन पुनर्भुगतान पर आनुपातिक रूप से कर कटौती का दावा कर सकते हैं। पांच साल के भीतर बेचने पर लाभ उलट जाते हैं। मुख्य शर्तों में स्वामित्व, पुनर्भुगतान में भागीदारी और ऋण का भार वहन करना शामिल है।