Join us

व्होडाफोन ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:28 IST

टेलिकॉमसंबंधी विविध उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या इरिक्सननेही काही दिवसांपूर्वी ८५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. 

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने पुढील तीन वर्षांत सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकर कपात करण्याची तयारी केली आहे. आगामी काळात महसुलात फारशी वाढ न होण्याची अपेक्षा असल्याने कंपनीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नोकर कपात करण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गेरेट डेल्ला यांची सांगितले की, अनावश्यक खर्च टाळून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी पुढील काळात विकेंद्रीकरणावर भर दिला जाईल. पुढील तीन वर्षांमध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल.  

इरिक्सनकडूनही नोकर कपातटेलिकॉमसंबंधी विविध उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या इरिक्सननेही काही दिवसांपूर्वी ८५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. 

टॅग्स :व्होडाफोनकर्मचारी