Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ४ आणि ५ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत असून, संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. या दरम्यान, पुतिन यांच्या निवासाची व्यवस्था दिल्लीतील सुप्रसिद्ध आयटीसी मौर्या हॉटेलमधील 'प्रेसीडेंशियल सुट' मध्ये करण्यात आली आहे. या सुटला 'चाणक्य सुट' म्हणूनही ओळखले जाते. याच चाणक्य सुटमध्ये यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्यासारखे ग्लोबल आयकॉनही थांबले आहेत. पुतिन यांच्या सुरक्षेसाठी रशियन सुरक्षा पथक भारतात दाखल झाले असून, त्यांनी या निवासस्थानाची पाहणी पूर्ण केली आहे.
आयटीसी मौर्या : ४० वर्षांची परंपरा आणि भव्यताआयटीसी मौर्या हे हॉटेल गेल्या ४० वर्षांपासून भारत भेटीवर येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचे आणि जागतिक नेत्यांचे आवडते ठिकाण राहिले आहे. या हॉटेलमध्ये एकूण ४११ खोल्या आणि २६ सुट्स आहेत. यात बुखारा आणि दम पुख्तसारखे अनेक पुरस्कार विजेते रेस्टॉरंट्स आहेत. भव्य कॉन्फरन्स आणि बँक्वेट व्हिन्यू, उत्कृष्ट वेलनेस सुविधा आणि शाही जेवणाचा अनुभव हे या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे.
'चाणक्य सुट'ची शाही ओळखराजधानीत २००७ मध्ये या हॉटेलची स्थापना झाली. चंद्रगुप्त मौर्याला सत्ता मिळवून देणारे महान अर्थतज्ज्ञ आणि रणनीतीकार चाणक्य यांचं नाव हॉटेलला देण्यात आलं. ४,६०० चौरस फुटांमध्ये पसरलेला हा सुट त्याच्या अप्रतिम सजावटीसाठी आणि वास्तूशैलीसाठी ओळखला जातो. रेशमी कपड्यांनी सजलेली आर्ट-वॉल्स पाहुण्यांना एका शाही गॅलरीतून चाणक्य यांच्या भव्य मूर्तीकडे घेऊन जातात. या सुटमध्ये मास्टर बेडरूम, वॉक-इन वॉर्डरोब, खाजगी स्टीम रूम, सौना, जिम, १२ आसनांची डाइनिंग रूम, गेस्ट रूम, स्टडी आणि ऑफिस स्पेस यांसारख्या खास सुविधा आहेत. अजीज आणि तैयब मेहता यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या दुर्मिळ कलाकृतीही येथे सजवलेल्या आहेत.
एका रात्रीचा खर्च ८ ते १० लाख रुपयेया शाही सुविधांचा अनुभव घेण्यासाठी एका दिवसाचा खर्च सुमारे ८ ते १० लाख रुपये आहे. येथे थांबणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगातील कोणत्याही भागातील विशिष्ट सामग्री वापरून बनवलेली कोणतीही डिश ऑर्डर करण्याचा विशेष विशेषाधिकार मिळतो.
पुतिन यांच्या या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या या 'शाही' मुक्कामाकडे लागले आहे.
Web Summary : Vladimir Putin's India visit includes a stay in Delhi's ITC Maurya's 'Chanakya Suite', previously favored by global leaders. The opulent suite, costing ₹8-10 lakh a night, boasts exclusive amenities and curated art. Security is heightened for Putin's visit, where key agreements are anticipated.
Web Summary : व्लादिमीर पुतिन की भारत यात्रा में दिल्ली के आईटीसी मौर्या के 'चाणक्य सुइट' में प्रवास शामिल है, जो पहले वैश्विक नेताओं का पसंदीदा रहा है। ₹8-10 लाख प्रति रात का यह आलीशान सुइट विशेष सुविधाओं और कला से परिपूर्ण है। पुतिन की यात्रा के लिए सुरक्षा बढ़ाई गई है, जहाँ महत्वपूर्ण समझौतों की उम्मीद है।