Join us

Tata Group ची 'ही' एअरलाइन्स देतेय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी, 12 जानेवारीपर्यंत करा बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:01 IST

Vistara announces anniversary sale : टाटा ग्रुपची (Tata Group) प्रीमियम एअरलाइन्स विस्तारा तुम्हाला कमी पैशात तिकीट बुक (Ticekt Booking) करण्याची संधी देत ​​आहे.

नवी दिल्ली : तुम्हीही विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्हीही येत्या काही दिवसांत कुठेतरी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही स्वस्तात तिकीट बुक करू शकता. टाटा ग्रुपची (Tata Group) प्रीमियम एअरलाइन्स विस्तारा तुम्हाला कमी पैशात तिकीट बुक (Ticekt Booking) करण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने आपल्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी ही ऑफर आणली आहे.

विस्ताराने केले ट्विटविस्ताराने आपल्या 8 व्या वर्धापनदिनानिमित्त एक खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अॅडव्हॉन्स सीट सिलेक्शन आणि अॅक्सेस बॅगेजवर 23 टक्के सूट मिळणार आहे. यासोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान तुमचा प्रवास आनंददायी करण्यासाठी विस्ताराने खास ऑफर आणली आहे.

चेक करा अधिकृत लिंकया सेलबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत लिंक https://bit.ly/3IFmP90 ला भेट देऊ शकता.

12 जानेवारीपर्यंत करू शकता बुकिंगविस्तारा तुम्हाला या सेलमध्ये फक्त 1899 रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने सांगितले आहे की, या सेलमध्ये तुम्ही 12 जानेवारीपर्यंत स्वस्तात तिकीट बुक करू शकता. दरम्यान, सध्या तुमच्याकडे तिकीट बुक करण्यासाठी 4 दिवस आहेत.

कधी प्रवास करू शकता?या सेलमध्ये तुम्ही 23 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान प्रवास करू शकता. देशांतर्गत प्रवासासाठी एकेरी तिकीटाची किंमत 1899 रुपयांपासून सुरू होते. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय परतीच्या तिकिटाची किंमत 13,299 रुपयांपासून सुरू होत आहे. यासोबतच कंपनी अॅडव्हॉन्स सीट सिलेक्शन आणि अॅक्सेस बॅगेजवर 23 टक्के सूट देत आहे.

टाटा समूहाची जवळपास 51 टक्के भागीदारीविस्तारा एअरलाइनमध्ये टाटा समूहाची जवळपास 51 टक्के भागीदारी आहे आणि उर्वरित 49 टक्के भागीदारी सिंगापूर एअरलाइन्सकडे (SIA) आहे. सध्या सिंगापूर एअरलाइन्सने विस्ताराचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. या करारांतर्गत 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली जाणार आहे.

टॅग्स :टाटाविमान