Vikram Solar IPO listing : सौर फोटोव्होल्टेइक (PV) मॉड्यूल्सची निर्मिती करणारी कंपनी विक्रम सोलरचे शेअर्स आज भारतीय शेअर बाजारात पदार्पण करत आहेत. कंपनीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला (IPO) गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्याने याची लिस्टिंग दमदार प्रीमियमसह होण्याची शक्यता आहे. विक्रम सोलरचे शेअर्स आज बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) या दोन्ही एक्सचेंजवर सूचीबद्ध होणार आहेत. १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान विक्रम सोलरचा २,०७९ कोटी रुपयांचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता.
IPO आणि सब्सक्रिप्शनची आकडेवारीया आयपीओला एकूण ५४.६३ पट सबस्क्रिप्शन मिळाले, जे अतिशय उत्तम मानले जाते. यातील विविध श्रेणींमधील आकडेवारी अशी:
- किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors): ७.६५ पट
- पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIBs): १४२.७९ पट
- बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIs): ५०.९० पट
लिस्टिंगचा अंदाज: जीएमपी काय सांगते?लिस्टिंगपूर्वी शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार ग्रे मार्केट प्रीमियमवर (GMP) लक्ष ठेवून असतात. आज विक्रम सोलर आयपीओचा जीएमपी ३८ रुपये आहे. याचा अर्थ, ग्रे मार्केटमध्ये शेअर्स त्यांच्या इश्यू प्राईजपेक्षा ३८ रुपयांनी जास्त दराने ट्रेड करत आहेत.
- इश्यू प्राईज: ३३२ रुपये प्रति शेअर
- अंदाजित लिस्टिंग प्राईज: ३७० रुपये
- प्रीमियम: जवळपास ११.४५%
विश्लेषकांनाही विक्रम सोलरच्या शेअर्सची लिस्टिंग चांगल्या प्रीमियमसह होण्याची अपेक्षा आहे. INVasset PMS चे बिझनेस हेड हर्षल दसाणी यांच्या मते, आयपीओला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादावरून लिस्टिंग किंमत विश्लेषकांच्या अंदाजाच्या वरच्या स्तरावर राहील. विक्रम सोलरचे शेअर्स आज विशेष प्री-ओपन सेशन (SPOS) चा भाग असतील आणि सकाळी १०:०० वाजेपासून त्यांचे ट्रेडिंग सुरू झाले आहे.
वाचा - शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)