Join us

Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:35 IST

Elon Musk Tesla Showroom: टेस्लानं मंगळवार, १५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये भारतातील पहिलं शोरूम सुरू केलं.

Elon Musk Tesla Showroom: टेस्लानं मंगळवार, १५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये भारतातील पहिलं शोरूम सुरू केलं. भारतात व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं टेस्लासाठी हे लाँच एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची ओळख बनलेल्या या कंपनीनं आता भारतीय ग्राहकांसाठीही तांत्रिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील वाहनांची श्रेणी आणली आहे. भारतात टेस्लाच्या एन्ट्रीबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. परंतु आता टेस्ला प्रत्यक्षात भारतात आलीये. येत्या काळात कंपनी देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये शोरूम आणि सर्व्हिस सेंटर्स उघडण्याची योजना आखत आहे.

या शोरूममध्ये तुम्हाला काय मिळेल?

हे शोरूम फक्त डीलरशिप नसून एक एक्सपिरिअन्स सेंटर असेल जिथे ग्राहकांना:

- टेस्ला वाहनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल- टेस्ट ड्राइव्ह बुक करता येईल- त्यांच्या आवडीनुसार वाहने कस्टमाइझ करता येतील- तिथून ऑन-द-स्पॉट बुकिंग आणि ऑर्डर देखील करता येतील.

मॉडेल Y SUV भारतात दाखल

शोरूम लाँच होण्यापूर्वी, टेस्लानं चीनमधील शांघाय प्लांटमधून त्यांच्या लोकप्रिय मॉडेल Y SUV च्या सहा युनिट्स मुंबईत पाठवल्या आहेत. या वाहनांचा वापर डिस्प्ले आणि डेमोसाठी केला जाईल. भारतातील टेस्ला वाहनांची ही पहिली झलक असेल.

किंमत आणि टॅक्सची स्थिती

आतापर्यंत टेस्लानं भारतातील वाहनांच्या अधिकृत किंमती जाहीर केलेल्या नाहीत, परंतु सुरुवातीची मॉडेल पूर्णपणे आयात केली जाणार असल्यानं (CBU), त्यांच्यावर ७०% पर्यंत आयात शुल्क आकारलं जाईल. याचा थेट परिणाम किमतींवर होईल आणि मॉडेल Y सारखी वाहने सुरुवातीला लक्झरी सेगमेंटमध्ये राहतील.

टॅग्स :टेस्लाएलन रीव्ह मस्क