Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियंत्रणाखाली व्हेनेझुएलाचं कच्चं तेल; वारंवार देताहेत भारताला धमकी आहे, एकंदरीत गणित बदलेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:52 IST

Venezuela Crisis: आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत सध्या मोठी खळबळ माजली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेनं वेनेझुएलाच्या अफाट तेल साठ्यावर मिळवलेले नियंत्रण.

Venezuela Crisis: आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत सध्या मोठी खळबळ माजली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेनं वेनेझुएलाच्या अफाट तेल साठ्यावर मिळवलेले नियंत्रण. वेनेझुएलाकडे सुमारे ३०३ अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे, जो जगाच्या एकूण साठ्याचा १७% आहे आणि तो सौदी अरेबियापेक्षाही जास्त आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची ताकीद दिली आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली, तर भारतावर अधिक टॅरिफ लादलं जाईल, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. जर भारतानं अमेरिकेच्या दबावाखाली रशियाची जागा अमेरिकेला दिली, तर हे भारताच्या ऊर्जा समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणेल.

सध्या बहुतांश तज्ज्ञांचं असं मत आहे की, वेनेझुएला संकटामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर तातडीनं कोणताही मोठा परिणाम होणार नाही, कारण भारताची वेनेझुएलाकडून होणारी तेल आयात सध्या अत्यंत कमी आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत अमेरिकेची थेट एन्ट्री झाल्यानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.

मोठ्या घसरणीसह शेअर बाजाराची सुरुवात; सोन्या-चांदीच्या दरात तेजी, ऑईल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री

भारतासाठी कच्च्या तेलाचं महत्त्व आणि आकडेवारी

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातक आणि ग्राहक देश आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमधील कोणताही बदल भारताची वित्तीय तूट आणि महागाईवर थेट परिणाम करतो. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान भारतानं १७.८१ कोटी टन कच्चं तेल आयात केलं, ज्यामध्ये रशिया ६ कोटी टनांसह सर्वात मोठा पुरवठादार होता, तर अमेरिकेने १.३ कोटी टन तेलाचा पुरवठा केला. वेनेझुएलाकडे रशिया आणि अमेरिकेच्या एकत्रित साठ्यापेक्षाही जास्त कच्चं तेल आहे, जे भारतासाठी दीर्घकाळात महत्त्वाचं ठरू शकतं.

वेनेझुएलासोबतचे व्यापारी संबंध

२००० आणि २०१० च्या दशकात भारत वेनेझुएलाचा प्रमुख ग्राहक होता आणि ONGC Videsh सारख्या कंपन्यांची तिथे गुंतवणूक होती. मात्र, २०१९ च्या अमेरिकन निर्बंधांमुळे हा व्यापार लक्षणीयरीत्या घटला. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वेनेझुएलाकडून भारताची आयात केवळ ३६.४५ कोटी डॉलर्स होती, जी मागील वर्षाच्या १.४ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ८१.३% कमी आहे.

ट्रम्प यांची एन्ट्री: संधी आणि आव्हानं

वेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाचे भारतासाठी सकारात्मक पैलू म्हणजे:

  • ONGC Videsh चे अडकलेले सुमारे १ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००१ कोटी रुपये) परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
  • रिलायन्स आणि नायरा यांसारख्या भारतीय रिफायनरीज वेनेझुएलाच्या 'हेवी क्रूड ऑईल'वर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असल्यानं भारताला स्वस्त तेलाचा एक मोठा पर्याय पुन्हा उपलब्ध होऊ शकतो. 

मात्र, सर्वात मोठं आव्हान ट्रम्प यांची रशियावरील धमकी हे आहे. ट्रम्प यांना भारतानं रशियासोबत अंतर राखावं आणि अमेरिकेकडून तेल खरेदी करावं असं वाटतं. भारत सध्या आपली मोठी गरज रशियाकडून सवलतीच्या दरात पूर्ण करत आहे. रशियाला सोडून पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून राहणं भारताच्या 'धोरणात्मक स्वायत्ततेसाठी' धोकादायक ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Venezuela Oil Control: India's Dilemma and Shifting Energy Equations.

Web Summary : Trump's control over Venezuelan oil creates a dilemma for India. While ONGC Videsh may recover funds and Reliance could benefit, Trump's threat to curb Russian oil imports poses challenges to India's energy strategy and autonomy.
टॅग्स :खनिज तेलअमेरिकाभारतडोनाल्ड ट्रम्प