Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे भाव घसरले; सणासुदीत पैसे वाचणार, कांदे ३० टक्के तर लसूण ५० टक्के स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 07:18 IST

मान्सून उत्तम झाला असल्यामुळे बटाटेवगळता कांदे, लसूण आणि टोमॅटोसह अन्य सर्व भाज्यांचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत घसरले आहेत.

नवी दिल्ली

मान्सून उत्तम झाला असल्यामुळे बटाटेवगळता कांदे, लसूण आणि टोमॅटोसह अन्य सर्व भाज्यांचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत घसरले आहेत. व्यावसायिकांनी सांगितले की, भरघोस उत्पन्न आणि बाजारात वाढलेली आवक यामुळे आगामी दोन महिन्यांच्या काळात भाज्यांच्या किमती वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात लोकांना दिलासा मिळेल. 

लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या भावात वार्षिक आधारावर ३० टक्के घसरण झाली आहे. तेथे सध्या कांदा १,१५२ रुपये क्विंटल आहे. ग्राहकांना तो २६ रुपये किलो दराने मिळत आहे. दिल्लीतील आझाद मंडीत कांदा १,५०० रुपये क्विंटल आहे. 

कर्नाटकातील कोलार येथे टोमॅटो ८७० रुपये क्विंटल आहे. जूनमध्ये तो तीन हजार रुपये होता. बटाट्याच्या टोमॅटो किमती मात्र गेल्यावर्षाच्या तुलनेत ६४ टक्के अधिक आहेत.

६३% लसूण उत्पादन होते एकट्या मध्य प्रदेशात३२.७ लाख टन लसूण उत्पादन झाले २०२१-२२ मध्ये२००० रुपये प्रतिक्विटल दराने विकला जातोय लसूण इंदूरमध्ये₹१,५०० क्विंटल दराने विकला जातोय बटाटा₹८७० प्रतिक्विंटल विकला जातोय टोमॅटो कर्नाटकात₹१५ प्रतिकिलो लसणाचा भाव मिळतोय शेतकऱ्यांना

यंदा रडवणार नाही कांदायंदा पावसामुळे खरीप कांद्याची लागवड लांबली असून, उत्पादनही १५ टक्क्यांनी घटले आहे. तरीही कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता नाही, असे व्यावसायिकांना वाटते. सडण्याच्या भीतीने शेतकरी कांदा विकत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा ३५ टक्क्यांपर्यंत स्वस्त आहे.

असे आहेत दर (भाव रुपये/प्रति किलो)टोमॅटो ३५ रु - २४ टक्केलसूण २० रु. -५२ टक्केकांदे २६ रु. - ३५ टक्केबटाटे २८ रु. -६४ टक्के

पीठ स्वस्त?गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने हा निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे सणासुदीच्या काळा आटा स्वस्त होईल. तसेच गोरगरिबांना खाद्य सुरक्षा मिळेल.

टॅग्स :कांदा