Join us
Daily Top 2Weekly Top 5

४ पटींनी वाढणार कच्च्या तेलाचं उत्पादन! देशातील सर्वात मोठ्या खाजगी ऑईल कंपनीची घोषणा, 'या' अब्जाधीशाचा मेगा प्लॅन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:48 IST

ही कंपनी आपलं दैनंदिन कच्च्या तेलाचं उत्पादन चार पटीनं वाढवून १० लाख बॅरलपर्यंत नेण्याची योजना आखत आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय आहे त्यांचा प्लॅन.

Vedanta Anil Agarwal News: अब्जाधीश उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता लिमिटेडची उपकंपनी केर्न ऑईल अँड गॅस (Cairn Oil & Gas) पुढील दशकात आपलं दैनंदिन कच्च्या तेलाचं उत्पादन चार पटीनं वाढवून १० लाख बॅरलपर्यंत नेण्याची योजना आखत आहे. अग्रवाल यांनी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. केर्नचे अधिकारी या आठवड्यात अमेरिकेतील ह्युस्टन येथे असून ते ऑईलफील्ड कॉन्ट्रॅक्टर्सवर ५ अब्ज डॉलर (४७,०४१ कोटी रुपये) खर्च करण्याची तयारी करत आहेत. हे कंत्राटदार कंपनीला देशांतर्गत ऑईल फील्ड विकसित करण्यास मदत करतील, ज्यामध्ये शेल संरचनांचाही समावेश आहे, असं त्यांनी नमूद केलं.

असा आहे संपूर्ण प्लॅन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्रवाल यांनी सांगितलं की, भारतात 'यूएस शेल प्लेबुक' लागू करण्यासाठी १० अमेरिकन तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचं केर्नचं उद्दिष्ट आहे. कंपनीला आशा आहे की, यामुळे ड्रिलिंग आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेत एक तृतीयांश कपात होईल, ज्यामुळे उत्पादनाचा वेग वाढेल. कच्च्या तेलासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून असलेल्या भारताच्या व्यापक अर्थव्यवस्थेसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.

OnePlus जागतिक बाजारपेठेतून गाशा गुंडाळणार? भारतातील CEO रॉबिन लियू यांनीही दिला राजीनामा

चार शेल विहिरींचं ड्रिलिंग पूर्ण

वेदांताचे ७२ वर्षीय संस्थापक अनिल अग्रवाल यांनी माहिती दिली की, केर्ननं चार शेल विहिरींचं ड्रिलिंग पूर्ण केलं असून त्यांचं काम अद्याप पूर्ण व्हायचं आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक दिवसांपासून जहाजांसाठी महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद आहे. इराणनं या भागातून जाणाऱ्या अनेक जहाजांना लक्ष्य केले आहे.

केर्नकडून उत्पादनात कपात

केर्न ऑईल अँड गॅस ही भारतातील सर्वात मोठी खाजगी तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक कंपनी आहे. कंपनीनं आपल्या उत्पादनात १०% कपात केली आहे. बुधवारी अग्रवाल यांनी स्पष्ट केलं की, प्रामुख्यानं पश्चिम आशियातील संकटामुळे शिपिंग आणि लॉजिस्टिक्समध्ये आलेल्या अडचणींमुळे ही कपात करण्यात आलीये. यामुळे उत्पादन १,१०,००० बॅरल प्रति दिवसांवरुन कमी झालंय. अग्रवाल यांच्या मते, उत्पादनात यापेक्षा जास्त कपात होण्याची शक्यता नाही. केर्नचं उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत उत्पादन ५,००,००० बॅरल प्रति दिवस इतकं वाढवण्याचं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vedanta to Quadruple Oil Production: Agarwal's $5 Billion Investment Plan

Web Summary : Vedanta's Cairn Oil & Gas aims to quadruple oil production to 1 million barrels daily within a decade. Anil Agarwal plans a $5 billion investment in US shale technology to accelerate drilling and reduce import dependence, despite current production cuts due to Middle East tensions.
टॅग्स :खनिज तेलभारत