Join us

एका शेअरवर ३ बोनस शेअर्स देणार कंपनी, रेकॉर्ड डेटचीही घोषणा; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:52 IST

कंपनी एका शेअरवर ३ शेअर बोनस देत आहे. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या बोनस स्टॉकबद्दल अधिक माहिती.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात पुन्हा काहीशी तेजी दिसून येत आहे. अशातच व्ही-मार्ट रिटेल लिमिटेडनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनी एका शेअरवर ३ शेअर बोनस देत आहे. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या बोनस स्टॉकबद्दल अधिक माहिती.

व्ही-मार्ट रिटेल इंडियानं शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरसाठी ३ शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी २३ जून २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदारांची नावे कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहतील, त्यांना बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, कंपनीनं २०२२ मध्ये एका शेअरवर ७५ पैशांचा डिविडेंड दिला होता. तर दुसरीकडे २०१९ मध्ये कंपनीनं प्रति शेअर १.७० रुपयांचा डिविडेंड दिला होता.

Vodafone Idea आता २०,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत, बोर्डाची मंजुरी; तोट्याचा सामना करतेय कंपनी

कशीये शेअरची कामगिरी?

व्ही मार्ट रिटेल इंडियाचा शेअर शुक्रवारी ०.१४ टक्क्यांनी घसरून ३,४०६.६० रुपयांवर बंद झाला. गेल्या ३ महिन्यांत या कंपनीनं गुंतवणूकदारांना १४ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. तर कंपनीच्या शेअरची किंमत वर्षभरात ६१ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या काळात सेन्सेक्स निर्देशांकात १० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.

व्ही-मार्ट रिटेल इंडियाचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४५१७.३० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २०५८.७० रुपये आहे. शुक्रवारी कंपनीचं मार्केट कॅप ६७५९.८७ कोटी रुपये होतं. दहा वर्षांत व्ही-मार्ट रिटेल इंडियाचे शेअर्स ५८२ टक्क्यांनी वधारलेत. याच कालावधीत सेन्सेक्स निर्देशांक १९२.६९ टक्क्यांनी वधारलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक