Join us

देशात दुध उत्पादनात उत्तर प्रदेश नंबर १! दिवसात १००० लाख लिटर उत्पादन, महाराष्ट्र कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:37 IST

Uttar Pradesh Milk Production : देशात दुध उत्पादन क्षेत्रात उत्तर प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आलं आहे. हे राज्य दिवसात १०६२ लाख लिटर दुधाचे उत्पादन करते.

Uttar Pradesh Milk Production :दूध म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर अमुल, गोकूळ, कात्रज किंवा चितळे उभे राहत असेल. गुजरातच्या अमुल दुधाला तर देशभर ओळखळं जातं. अरे असतानाही दुध उत्पादन क्षेत्रात मात्र उत्तर प्रदेश राज्याने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशने एका वर्षात ३८.७८ दशलक्ष टन दूध उत्पादन करून विक्रम केला आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशात दररोज १,०६२.४७ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार अवनीश कुमार अवस्थी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याची माहिती दिली. संघटित क्षेत्राने ३ कोटी ३५ लाख टन वार्षिक दराने म्हणजेच ९१.७८ लाख लिटर प्रतिदिन दुधावर प्रक्रिया केली आहे.

असंघटित क्षेत्र खूप मोठेसंघटित क्षेत्राकडून दररोज पुरवल्या जाणाऱ्या ९१.७८ लाख लिटर दुधापैकी PCDF ने दररोज ७.२६ लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली आहे. तर अमूल, मदर डेअरी आणि इतर खासगी कंपन्यांनी दररोज ८४.५२ लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली आहे. यात असंघटित क्षेत्रही मागे राहिलं नाही. याने वार्षिक १ कोटी ६.०४ लाख टन दुधाचे व्यवस्थापन केले आहे, म्हणजेच दररोज ४३९.४५ लाख लिटर दूध.

देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्यअवनीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य बनले आहे. हे रेकॉर्ड डेअरी क्षेत्राला बळकटी देण्याचे आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे वचन आहे.

महाराष्ट्र पहिल्या ५ मध्ये नाहीउत्तर प्रदेशानंतर राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात आणि पंजाब ही देशातील सर्वाधिक दूध उत्पादक राज्ये आहेत. २०२१-२२ मध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश होता. त्यावेळी जागतिक दूध उत्पादनाच्या २४ टक्के उत्पादन भारतात होते. अमूल ही भारतातील सर्वात मोठी दूध कंपनी आहे. यानंतर मदर डेअरी, केरळ को-ऑपरेटिव्ह, दूधशागर डेअरी, नंदिनी, पराग मिल्क, श्रेबर डायनॅमिक्स, तामिळनाडू को-ऑपरेटिव्ह, क्रीमलाइन डेअरी, तेलंगणा स्टेट डेअरी डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह येतात. विशेष म्हणजे यातही राज्यातील एकाही डेअरीचा समावेश नाही.

टॅग्स :उत्तर प्रदेशदूधयोगी आदित्यनाथ