Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:43 IST

Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे फेडरल रिझर्व्ह बँकही चिंतेत आहेत. देशात महागाई वाढून विकास मंदावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

Trump Tariff : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जगाला वेठीस धरल्यासारखं झालं आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध तर दुसरीकडे आयात शुल्क असे दुहेरी संकटात जगाची अर्थव्यवस्था सापडली आहे. अमेरिकेला ग्रेट बनवणार असल्याची वल्गना करणाऱ्या ट्रम्प यांच्याविरोधात खुद्ध अमेरिकेच्या फेड रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी टॅरिफ धोरणामुळे महागाई वाढून विकास मंदावू शकतो, असा इशारा दिला आहे. बुधवारी शिकागोच्या इकॉनॉमिक क्लबमध्ये एका कार्यक्रमात पॉवेल बोलत होते. 

ट्रम्प यांचे कर अपेक्षेपेक्षा जास्त  :डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवरील लादलेल्या टॅरिफला ३ महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. मात्र, आयात शुल्कावरुन पॉवेल यांनी चिंता व्यक्त केली आहे. यांचे गंभीर परिणाम फक्त जगालाच नाही तर अमेरिकेलाही भोगावे लागणार आहे. शिवाय, आतापर्यंत जाहीर केलेल्या दरांची पातळी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याचेही ते म्हणाले. "यामुळे महागाई वाढू शकते, आर्थिक वाढ मंदावू शकते आणि बेरोजगारी निर्माण होऊ शकते. अशा आव्हानांचा सामना फेडरल रिझर्व्हने गेल्या अर्ध्या शतकातही कधी केला नव्हता."

देशातील नागरिकांवर शुल्काचा भार : पॉवेल पुढे म्हणाले, वाढत्या महागाईमुळे कामगार बाजारावर दबाव वाढेल. ट्रम्प यांच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी इतर फेड धोरणकर्त्यांनीही व्याजदर स्थिर ठेवण्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या भार टॅरिफच्या स्वरुपात जनतेला सहन करावा लागेल.

वाचाबाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी

पॉवेल यांच्या विधानाचा शेअर बाजारावर परिणाम :पॉवेल यांच्या या विधानाचा परिणाम काल अमेरिकन शेअर बाजारात दिसून आला. एस अँड पी ५०० निर्देशांक ०.१७ टक्क्यांनी घसरून ५,३९६.६३ वर बंद झाला. त्याच वेळी, नॅस्डॅक ०.०५ टक्क्यांनी घसरून १६,८२३.१७ वर बंद झाला. डाओ जोन्स देखील ०.३८ टक्क्यांनी घसरून ४०,३६८.९६ वर बंद झाला. फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर इंडेक्समध्येही सुमारे ७ टक्क्यांची घसरण नोंदली गेली.  या काळात, एनव्हीडियाचे शेअर्स १० टक्क्यांनी आणि तंत्रज्ञानाचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरले.

टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाशेअर बाजार