Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तेल खरेदीसाठी भारत इतर पर्याय शोधतोय...', रशियन तेलाबाबत अमेरिकन राजदूतांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:48 IST

US on Russian oil: भारतातील अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

US on Russian oil: अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘पॅक्स सिलिका’मध्ये भारताने शुक्रवारी (20 फेब्रुवारी 2026) औपचारिक सहभाग नोंदवला. या पार्श्वभूमीवर भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी भारत-अमेरिका व्यापार करार, तसेच रशियन तेलाच्या खरेदीबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, तेल खरेदीसाठी भारत विविध पर्यायांचा विचार करत आहे. याशिवाय, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

भारत-अमेरिका ट्रेड डीलवर लवकरच स्वाक्षरी: सर्जियो गोर

सर्जियो गोर म्हणाले, भारत-अमेरिका ट्रेड डीलवर लवकरच स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. आम्ही दोन्ही देशांमधील संबंध पुढील स्तरावर नेत आहोत. पॅक्स सिलिका, संरक्षण सहकार्य आणि व्यापार संबंधांचा उल्लेख करत ते म्हणाले, दोन्ही देशांकडे एकत्र काम करण्यासाठी प्रचंड संधी आहेत. दीर्घकाळचे मतभेद दूर करण्यात आले आहेत. ही डील केवळ टॅरिफ आणि व्यापारापुरती मर्यादित नसून, दोन लोकशाही देशांनी ‘व्यापार करण्यापेक्षा एकत्र विकास करण्याची’ बांधिलकी दर्शवते.

तेल खरेदीसाठी पर्यायांचा शोध

इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सर्जियो गोर यांनी सांगितले की, भारत तेल खरेदीचे विविध पर्याय शोधत आहे. व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीबाबत चर्चा सुरू आहे. न्यूज एजन्सी ANIला दिलेल्या दुसऱ्या मुलाखतीत ते म्हणाले, तेलाच्या मुद्द्यावर समन्वय झाला आहे. भारताने ऊर्जा क्षेत्रात विविधता आणली आहे. हा भारताचा अंतर्गत विषय आहे. अमेरिकेला कोणत्याही देशाने रशियन तेल खरेदी करू नये असे वाटते. अध्यक्ष (डोनाल्ड ट्रम्प) याबाबत स्पष्ट आहेत; रशिया-युक्रेन युद्ध संपवून शांतता प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यावर रशियाची ठाम प्रतिक्रिया

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे दावा केला होता की, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमत झाला आहे. मात्र, भारताने याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. रशियानेही स्पष्ट केले आहे की, या संदर्भात नवी दिल्लीकडून त्यांना कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारताने यापूर्वी वारंवार सांगितले आहे की, देशाच्या जनतेच्या हितासाठी स्वस्त तेल खरेदी करणे हे प्राधान्य राहील. तथापि, भारताने व्हेनेझुएलासह इतर देशांकडून तेल आयात वाढवण्याचा विचार करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US: India exploring oil options, trade deal soon says envoy

Web Summary : US envoy states India seeks oil options amid Russia-Ukraine war. Trade deal with US imminent, boosting ties beyond tariffs. US wants no Russian oil purchases.
टॅग्स :खनिज तेलअमेरिकारशियाभारत