Join us

Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:23 IST

Urban Company IPO: ऑनलाइन होम सर्व्हिस प्रोव्हायडर अर्बन कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवसांत हा आयपीओ १०३ पट सबस्क्राईब झाला आहे. तुम्हाला शेअर्स अलॉट झालेत का, कसं पाहाल?

Urban Company IPO: ऑनलाइन होम सर्व्हिस प्रोव्हायडर अर्बन कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवसांत हा आयपीओ १०३ पट सबस्क्राईब झाला आहे. अर्बन कंपनीचा आयपीओ १० सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला होता, तर गुंतवणूकदारांनी १२ सप्टेंबरपर्यंत बोली लावली होती. आता गुंतवणूकदारांचे लक्ष त्याच्या शेअर वाटपावर आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शेअर वाटप आज म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी अंतिम होणार आहे, तर शेअर्स १७ सप्टेंबर रोजी सेकंडरी मार्केटमध्ये सूचीबद्ध होतील.

उद्यापासून मिळणार रिफंड

कंपनी लवकरच शेअर वाटप प्रक्रिया अंतिम करेल. शेअर वाटप झाल्यानंतर, ते १६ सप्टेंबर रोजी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. यासह, ज्यांना हा आयपीओ लागला नाही अशा गुंतवणूकदारांसाठी रिफंड प्रक्रिया देखील सुरू होईल. तुम्ही तुमच्या शेअर वाटपाची स्थिती कशी तपासू शकता ते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या

बीएसईवर वाटपाची स्थिती कशी तपासायची?

१.सर्वप्रथम बीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२.यानंतर 'इक्विटी' पर्याय निवडा आणि ड्रॉपडाउन मेनूमधून 'अर्बन कंपनी लिमिटेड' निवडा.

३.यानंतर तुमचा अर्ज क्रमांक किंवा पॅन क्रमांक एन्टर करा.

४. यानंतर सर्चवर क्लिक करा.

५.तुमची वाटपाची स्थिती स्क्रीनवर दिसेल.

NSE वर वाटपाची स्थिती कशी तपासायची

१.सर्वप्रथम, NSE च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

२.'इक्विटी आणि SME IPO बिड्स' पर्याय निवडा.

३.नंतर ड्रॉपडाउन मेनूमधून 'अर्बन कंपनी लिमिटेड' निवडा.

४.तुमचा पॅन आणि अर्ज क्रमांक एन्टर करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

५.तुमची वाटपाची स्थिती लगेच स्क्रीनवर दिसून येईल.

Urban Company IPO GMP

अर्बन कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) उत्कृष्ट राहिला आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, आज त्याचा जीएमपी प्रति शेअर ६८.५ रुपये आहे. अशा परिस्थितीत, कंपनीचे शेअर्स बाजारात त्यांच्या इश्यू किमतीपेक्षा ६८.५ रुपये अधिकवर ट्रेड करत आहेत.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक