Join us

UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:58 IST

NPCI UPI Payment: ८ ऑक्टोबरपासून युपीआयशी निगडित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. काय आहेत हे बदल आणि याचा काय होणार परिणाम जाणून घेऊ.

NPCI UPI Payment: देशात डिजिटल पेमेंट (Digital Payments) अधिक सोपं आणि सुरक्षित करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) युजर्सना व्यवहार करण्यासाठी PIN टाकण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी, ते फेस रेकग्नायझेशन (Face Recognition) किंवा फिंगरप्रिंटद्वारे त्यांचे व्यवहार अप्रुव्ह करू शकतील. ही नवीन सुविधा ८ ऑक्टोबरपासून लागू होईल. हे पाऊल RBI च्या नुकत्याच आलेल्या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे.

काय आहे सविस्तर माहिती

NPCI हे फीचर ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल, मुंबई येथे प्रदर्शित करणार आहे. यामुळे डिजिटल पेमेंट्स जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होतील. द इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या नवीन सुविधेमध्ये पेमेंटचे व्हेरिफिकेशन भारत सरकारच्या आधार प्रणालीमध्ये (Aadhaar System) नोंदवलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे केलं जाईल. याचा अर्थ, युजर्सचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट त्यांच्या आधार डेटाशी जुळवून पाहिलं जाईल आणि त्यानंतर पेमेंटला परवानगी मिळेल.

कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी

RBI च्या नवीन मार्गदर्शक सूचना

हे पाऊल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नुकत्याच आलेल्या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे, ज्यात डिजिटल व्यवहारांसाठी पर्यायी व्हेरिफिकेशन पद्धतींना परवानगी देण्यात आली होती. यामुळे डिजिटल पेमेंटमधील सुरक्षितता आणि युजर एक्सपरिअन्सया दोन्ही गोष्टी सुधारण्याची अपेक्षा आहे.

UPI एक्सपिरिअन्स होईल आणखी सोपा

सध्या, प्रत्येक UPI व्यवहारासाठी युजर्सना ४ किंवा ६ अंकी पिन टाकावा लागतो. नवीन सुविधा लागू झाल्यानंतर, फेस स्कॅन किंवा फिंगरप्रिंट सेन्सरद्वारे पेमेंट त्वरित व्हेरिफाय केलं जाईल. यामुळे व्यवहाराचा वेळ कमी होईल, सुरक्षा वाढेल आणि युजर एक्सपिरिअन्स अधिक सोपा होईल.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनमुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल, कारण चेहरा किंवा फिंगरप्रिंटची नक्कल करणं इतर कोणत्याही व्यक्तीस कठीण आहे. परंतु, डेटा सुरक्षितता आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी NPCI आणि UIDAI मध्ये मजबूत तांत्रिक प्रोटोकॉल वापरले जातील.

टॅग्स :पैसाभारतीय रिझर्व्ह बँकसरकार