Join us

Union Budget 2025: टॅक्स ५१ वेळा, टीडीएस २६ वेळा..., निर्मला सीतारमण यांच्या भाषणात कुठला शब्द आला किती वेळा? पाहा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:36 IST

Budget 2025: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यादरम्यान, निर्मला सीतारमण यांनी काही शब्दांवर विशेष भर दिला. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (Nirmala Sitharaman budget speech) कुठला शब्द कितीवेळा उच्चारला याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.

Nirmala Sitharaman budget speech: (Marathi News) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारमण यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यादरम्यान, निर्मला सीतारमण यांनी काही शब्दांवर विशेष भर दिला. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कुठला शब्द कितीवेळा उच्चारला याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक ५१ वेळा टॅक्स या शब्दाचा उल्लेख केला. तर २६ वेळा टीडीएस/टीसीएस शब्दाचा उल्लेख केला. त्यानंतर २२ वेळा कस्टम आणि टॅक्सपेयर, २१ वेळा भारत, मेडिकल, रिफॉर्म आणि शेतकरी हे शब्द प्रत्येकी २० वेळा, १८ वेळा स्किम, प्रत्येकी १७ वेळा एक्सपोर्ट आणि स्किम,  १५ वेळा एमएसएमई या शब्दाचा उल्लेख केला. त्याशिवाय इन्व्हेस्टमेंट, बँक आणि युथ या शब्दांचा प्रत्येकी १३ वेळा,  बजेट, स्कील, शिप, इकॉनॉमी, मॅन्युफॅक्चरिंग या शब्दांचा उल्लेख प्रत्येकी ११ वेळा, इन्फ्रास्ट्रक्चर, सस्टेनेबल, इलेक्ट्रॉनिक्स, ईज ऑफ डुईंग बिझनेस या शब्दांचा प्रत्येकी दहा वेळा उल्लेख आला. तर मोदी शब्दाचा उल्लेखही निर्मला सीतारमण यांनी १० वेळा उल्लेख केला.

या अर्थसंकल्पामध्ये युवा, स्किल आणि स्टार्टअप या शब्दांनाही प्राधान्य देण्यात आले. युवा, स्किल आणि मॅन्युफॅक्चरिंग शब्द ११ वेळा बोलला गेला. तर एमएसएमई आणि तज्ज्ञांनाही महत्त्व देण्यात आलं. सरकारने डिजिटल इंडिया आणि टेक्नॉलॉजी सेक्टरला भक्कम बनवण्यासाठी एआय, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही बॅटरीसारख्या शब्दांनाही अर्थसंकल्पात स्थान दिले.  

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामन