अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत. यानंतर त्यांनी लगेचच शिक्षण क्षेत्रासाठी एआयचा वापर आणि वैद्यकीयच्या १०००० जागा वाढविण्याची घोषणा केली आहे.
निर्मला सीतारमण यांनी आज अर्थमंत्री म्हणून आठवा अर्थसंकल्प मांडला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देशाचे लक्ष या अर्थसंकल्पातील घोषणांकडे लागले आहे. अर्थमंत्र्यांनी सुरुवातीलाच हे बजेट गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांसाठी असल्याचे जाहीर केले. कर्करोगावरील ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त असतील. अनेक औषधांवरील कस्टम ड्युटी काढून टाकली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी एक चांगली संस्था निर्माण केली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार अतिरिक्त जागा वाढवल्या जाणार आहेत. देशातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्स स्थापन केली जाणार आहेत. २०२५-२६ या वर्षात अशी २०० केंद्रे उभारली जाणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी केली.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांसाठीही योजना आणण्यात आली आहे. सरकार त्यांचे ओळखपत्र बनवण्यास मदत करणार आहे. तसेच त्यांना ई-श्रम कार्ड प्रदान केले जाणार आहे. १ कोटी गिग कामगारांना याचा फायदा होणार आहे, असे त्या म्हणाल्या.
कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करणार
बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट इन्स्टिट्युट सुरू करणार. याशिवाय देशात एआयच्या अभ्यासाठी तीन केंद्र उभारली जाणार. कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करणार. वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात १० हजार जागा वाढवल्या जाणार. ५ वर्षांमध्ये ७५ हजार जागा वाढवल्या जाणार. भारतीय भाषांमधील पुस्तकांना चालना देणार. सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० ची सुरूवात करणार.
खेळण्यांच्या क्षेत्रात भारताला ग्लोबल हब बनवणार
खेळण्यांच्या क्षेत्रात भारताला ग्लोबल हब बनवणार. याशिवाय लेदर स्कीमद्वारे २२ लाख नवे रोजगार निर्माण होणार. लेबर इंटेसिव्ह क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजनांची घोषणा. फुटवेअर, लेदरसाठी नवी योजना येणार