Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2022: वार्षिक कमाई ५ लाखांपेक्षा जास्त आहे, मग काय पर्याय आहे कर न भरता पैसे वाचतील?

Union Budget 2022: वार्षिक कमाई ५ लाखांपेक्षा जास्त आहे, मग काय पर्याय आहे कर न भरता पैसे वाचतील?

करदाते आता इन्कम टॅक्स रिटर्न AY २ वर्षाच्या आत फाईल करु शकतात. निर्मला सीतारामन यांच्या नव्या घोषणेमुळे टॅक्सबाबत विवादांची संख्या कमी होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:00 PM2022-02-01T21:00:53+5:302022-02-01T21:01:18+5:30

करदाते आता इन्कम टॅक्स रिटर्न AY २ वर्षाच्या आत फाईल करु शकतात. निर्मला सीतारामन यांच्या नव्या घोषणेमुळे टॅक्सबाबत विवादांची संख्या कमी होईल.

Union Budget 2022: Annual income is more than 5 lakhs, so what is the option to save money without paying taxes? | Union Budget 2022: वार्षिक कमाई ५ लाखांपेक्षा जास्त आहे, मग काय पर्याय आहे कर न भरता पैसे वाचतील?

Union Budget 2022: वार्षिक कमाई ५ लाखांपेक्षा जास्त आहे, मग काय पर्याय आहे कर न भरता पैसे वाचतील?

नवी दिल्ली – बजेट, बजेट बजेट, मागील काही दिवसांपासून देशाचे नागरिक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो अर्थसंकल्प आता संसदेत मांडला गेला. परंतु मध्यमवर्गीयांना काय मिळालं? देशातील सर्वसामान्य नोकरदार वर्गाला ज्या आयकरातील सूटची अपेक्षा असते यंदाही त्याबाबत दिलासा मिळाला नाही. टॅक्स स्लॅब आणि टॅक्स दरात कुठलाही बदल नाही. परंतु करदात्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

करदाते आता इन्कम टॅक्स रिटर्न AY २ वर्षाच्या आत फाईल करु शकतात. निर्मला सीतारामन यांच्या नव्या घोषणेमुळे टॅक्सबाबत विवादांची संख्या कमी होईल. सर्वसामान्यांना यंदाही इन्कम टॅक्स स्लॅब दरात कुठलाच बदल केला नाही. म्हणजे तुमची २.५० लाखाची वार्षिक कमाई करमुक्त असेल. परंतु इन्कम टॅक्स एक्टअंतर्गत मिळणाऱ्या तरतुदीचा वापर करुन टॅक्समध्ये सूट मिळू शकतो. अनेक लोकांचा टॅक्स स्लॅबबाबत खूप गोंधळ उडतो. इन्कम जास्त असली तरी काहीजण टॅक्स भरत नाहीत. कर भरणं स्मार्टनेस असल्याचं तज्ज्ञ सांगतात. स्मार्ट लोक सरकारकडून मिळणाऱ्या सूटचा पूर्णपणे फायदा घेतात.

सरकारी आणि खासगी फर्ममध्ये काम करणाऱ्या सीए श्वेतांशु शेखर यांनी सांगितले की, आता तुम्हाला ITR फाईल करण्यासाठी २ ऑप्शन मिळतात. नव्या टॅक्स स्लॅबमध्ये ५ लाख रुपयांहून जास्त इन्कमवर टॅक्स दर कमी ठेवली आहे. परंतु स्टँडर्ड डिडक्शन हटवण्यात आले. ५ लाखाखाली इन्कम असेल तर दोन्ही पर्यायात टॅक्स दर समान आहेत. २.५ लाख रुपयांपर्यंत टॅक्स फ्री आणि २.५ ते ५ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के कर भरावा लागेल.

उदाहरण समजा...

तुमची नेट इन्कम ५ लाख रुपये आहे तरी इन्कम टॅक्स एक्टच्या ८७ अ चा फायदा घेत टॅक्स वाचवू शकतात. जर तुमची इन्कम २.५ लाखांहून अधिक आहे आणि ५ लाख रुपयांपर्यंत असेल तर टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला ५ लाख-२.५ लाख म्हणजे २.५० लाखांवर ५ टक्के कर भरावा लागेल. श्वेतांशु शेखर यांनी सांगितले की, सरकार २.५ लाख ते ५ लाखांपर्यत कमाईवर ५ टक्के कर लागतो. परंतु इन्कम टॅक्स एक्ट सेक्शन ८७ अ अंतर्गत करात सवलत दिली जाते. म्हणजे तुमची वार्षिक टॅक्सेबल इन्कम ५ लाखांपर्यत असेल तर तुम्हाला अडीच लाखांवर ५ टक्के म्हणजे १२५०० रुपये कर लागेल. जी सरकार ८७ अ अंतर्गत तुम्हाला सवलत दिली जाईल.

जास्त इन्कम असेल तर...

इन्कम टॅक्स एक्ट १९६१ च्या सेक्शन ८७अ अंतर्गत सवलतीची मर्यादा १२५०० रुपये आहे. ही त्यांच्यासाठी टॅक्सेबल इन्कम ५ लाखांपर्यंत आहे. परंतु जर तुमची कमाई ५ लाखांहून अधिक असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. म्हणजे तुमची टॅक्सेबल इन्कम ५ लाख २० हजार रुपये असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा २० हजारावर कर लागेल. २.५० लाखांच्या सवलतीची सूट असेल.

तसेच श्वेतांशुनं सांगितले की, अन्य सवलतीसोबत तुम्ही ८७ अ सूट घेऊ शकता. म्हणजे समजा, तुमची ग्रॉस इन्कम ६.५० लाख वार्षिक असेल. तर अशावेळी तुम्हाला सेक्शन ८० सी अंतर्गत दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकता. म्हणजे तुमची टॅक्सेबल इन्कम ५ लाख असेल. आता ५ लाखांवर अडीच लाखांपर्यंत सूट असते तर उरलेल्या अडीच लाखांवर ५ टक्के प्रमाणे १२,५०० रुपये कर द्यावा लागेल. परंतु सरकारकडून ८७ अ अंतर्गत १२५०० सूट आहे. यासाठी तुम्हाला १ पैसाही टॅक्स द्यावा लागणार नाही.  

Web Title: Union Budget 2022: Annual income is more than 5 lakhs, so what is the option to save money without paying taxes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.