नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार-2 च्या पहिला अर्थसंकल्पात नेमकं काय काय असणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 7 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज काल आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना सीतारामन यांनी व्यक्त केला. अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. सीतारामन यांच्याकडे ब्रिफकेस नसल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यामागील कारण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी सांगितलं. 'अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे,' असं सुब्रमणियन म्हणाले.
Union Budget 2019: ..म्हणून 'बजेट ब्रिफकेस' न घेताच निर्मला सीतारामन निघाल्या; 'ती' परंपरा मोडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 10:01 IST