Join us

Union Budget 2019 Highlights: कुठे फटका? कुठे फायदा? जाणून घ्या... मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 14:33 IST

Budget 2019 Key Facts: मोदी सरकार-2 च्या पहिल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली: देशाच्या पहिल्या महिला पूर्ण वेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प आज सादर केला. लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सत्ता राखणाऱ्या मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यामुळेच अनेकांचं लक्ष मोदी सरकार-2 च्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. जाणून घेऊया या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे.परवडणाऱ्या घरावरील कर्जावरील करात सूटसध्या गृह कर्जावर 2 लाखांची सवलत मिळते. या सवलतीत आता दीड लाखांची भर पडणार आहे. यापुढे 45 लाखांचं घर खरेदी केल्यावर 3.5 लाखांची सूट मिळेल. यामुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळणार आहे. पेट्रोल, डिझेल, सोनं महागणारपेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सोन्यासह बहुमूल्य धातूंवरील सीमा शुल्कात 2.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आधी 10 टक्के असलेलं सीमा शुल्क 12.5 टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे. रोख रक्कम काढल्यास करबँक खात्यातून वर्षाला 1 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम काढल्यास 2 टक्के कर द्यावा लागणार आहे. रोख रकमेतील व्यवहार कमी करुन डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पॅन कार्डऐवजी आधार कार्ड चालणारपॅन कार्ड नसलेल्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे ज्या ठिकाणी पॅन कार्डची माहिती मागितली जाईल, त्या ठिकाणी आधार कार्डची माहिती देता येईल. प्राप्तिकर करताना पॅन कार्ड अनिवार्य होतं. मात्र आता आधार कार्डच्या मदतीनंदेखील प्राप्तिकर भरता येऊ शकेल.

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2019आयकर मर्यादाइन्कम टॅक्स