Join us

Budget 2018 Live: टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही; अरुण जेटलींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 13:21 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यांच्या पेटाऱ्यातून आपल्याला काय मिळणार आणि ते आपल्या खिशात कसा हात घालणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बजेटबाबतचे सर्व ताजे अपडेट्स देणारा हे विशेष LIVE पेज...

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यांच्या पेटाऱ्यातून आपल्याला काय मिळणार आणि ते आपल्या खिशात कसा हात घालणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बजेटबाबतचे सर्व ताजे अपडेट्स देणारा हे विशेष LIVE पेज...

>> नोकरदारांना ४० हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन दिल्यानं ८ हजार कोटींचा महसूल कमी 

>> स्टँडर्ड डिडक्शनमुळे ४ लाखांपर्यंत कमावणाऱ्या नोकरदारांना होणार २१०० रुपयांचा फायदा

>> १ लाख रुपयापेक्षा अधिक दीर्घकालीन भांडवली नफ्यावर द्यावा लागणार १० टक्के कर; घोषणेनंतर शेअर बाजार गडगडला...

>> म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर १० टक्के कर लागणार

>> शिक्षण, आरोग्यावरील सेसमध्ये १ टक्क्याची वाढ

>> सीमा शुल्कात (कस्टम ड्युटी) वाढ केल्यानं टीव्ही आणि मोबाइलच्या किमती वाढणार...

>> ज्येष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज - अरुण जेटली

>> नोकरदारांना ४० हजारांचं स्टँडर्ड डिडक्शन; उत्पन्नापेक्षा ४० हजार कमी रकमेवर भरावा लागणार कर...

>> इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाहीः अरुण जेटलींची घोषणा

>> उद्योगविश्वाला मोठा दिलासा; २५० कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या कंपन्यांवर २५ टक्के कॉर्पोरेट टॅक्स...

>> गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ लाख अधिक व्यक्तींनी भरला कर... या वर्षी कर भरणाऱ्यांची संख्या ८ कोटी २७ लाख...

>> राष्ट्रपतींचं वेतन ५ लाख, उपराष्ट्रपतींचं ४ लाख आणि राज्यपालांचं ३.५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव...

>> गरीबांना मोफत डायलिसीसची सुविधा पुरवणार 

>> खासदारांचं वेतन आणि भत्ते निश्चित करण्यासाठी नवा कायदा... दर पाच वर्षांनी होणार समीक्षा... १ एप्रिलपासून लागू होणार व्यवस्था - जेटली

>> राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात वाढ 

>> बँकांच्या सक्षमीकरणासाठी ८० हजार कोटींचे बॉण्ड्स बाजारात आणण्याची योजना...

>> निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ७२ हजार कोटी रुपये होतं, ते  लाख कोटींपेक्षा जास्त झालं...

>> एअरपोर्टची संख्या वाढल्यास १०० कोटी प्रवाशांना सेवा पुरवता येईल...

>> विमानतळांची संख्या ५ टक्क्यांनी वाढवणार... ९०० पेक्षा जास्त विमानं खरेदी करणार... सध्या १२४ विमानतळं सेवेत...

>> मुंंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी बडोद्यात प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचं काम सुरू 

>> मुंबईत ११ हजार कोटी रुपये खर्चून ९० किमी रेल्वे ट्रॅकचं दुहेरीकरण करणार

>> देशभरात ६०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण, रेल्वे रूळ दुरुस्तीचं मोठं काम

>> राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष योजनेअंतर्गत सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना...

>> रेल्वेच्या विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद

>> ४ हजार किमी रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचं कामही पूर्ण करणार

>> १८ हजार किमी रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण करण्याचं काम प्रगतीपथावर

>> ९ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं लक्ष्य

>> स्मार्ट सिटी योजनेत नव्या ९९ शहरांची निवड 

>> टेक्सटाइल्सच्या विकासासाठी ७१४० कोटी रुपये खर्च करणार

>> येत्या वर्षभरात तब्बल ७० लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष्य

>> नव्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफमध्ये सरकार १२ टक्के रक्कम देणार

>> नोटाबंदीनंतर उद्योगांचं झालेलं नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने लघुउद्योगांसाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद

>> मुद्रा योजनेतून ३ लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटण्याचं उद्दिष्ट

>> ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि घरांसाठी १४.३४ लाख कोटी

>> ५६ हजार कोटींचा निधी अनुसूचित जातींच्या विकासासाठी मंजूर...

>> देशातील ४० टक्के नागरिकांना स्वास्थ्य विमा योजना उपलब्ध, गरीबांना फायदा होणार...

>> 'नमामि गंगे' अंतर्गत १८७ प्रकल्प मंजूर, त्यातील ४७ योजना पूर्ण... गंगा नदीकाठच्या गावांमध्ये स्वच्छता मोहीम यशस्वी...

>> टीबी रोखण्यासाठी ६०० कोटींची नव्याने तरतूद

>> देशभरात २४ नवी मेडिकल कॉलेज उघडणार ... ३ लोकसभा मतदारसंघांमागे एक मोठं हॉस्पिटल... 

>> 'आयुषमान भारत' कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा फायदा ५० कोटी लोकांना होणार, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी मिळणार ५ लाख रुपये... १२०० कोटी रुपयांची तरतूद 

>> आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी एकलव्य स्कूलची उभारणी करणार

>> शेती कर्जासाठी तब्बल ११ लाख कोटींची तरतूद

>>  १ लाख कोटी रुपयांचा निधी शैक्षणिक क्षेत्रात खर्च करणार

>> प्री-नर्सरी ते १२ वी पर्यंतचं शैक्षणिक धोरण एकच राहील याची काळजी घेणार

>> बचत गटांना ४२ हजार कोटींवरून ७५ हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय

>> २०२२ पर्यंत गरीबांना हक्काचं घर देण्यासाठी ५१ लाख घरं बांधली... पुढच्या वर्षी आणखी ५१ लाख घरं बांधणार  

>> येत्या वर्षात २ कोटी शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट

>> पंतप्रधान सौभाग्य योजनेतून ४ कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देणारः अर्थमंत्री

>> देशातील ८ कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार ः अर्थमंत्री

>> १० हजार कोटी रुपये मत्स्यधन आणि पशुधन विकासासाठी खर्च करणार ः जेटली

>> राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी रुपये

>> १०० अब्ज डॉलर्सचा शेतीमाल सध्या निर्यात केला जातो... त्यासाठी देशभरात ४२ फूड पार्क उभारली जाणारः अर्थमंत्री

>> टोमॅटो, बटाट्यांचं प्रचंड उत्पादन हे सरकारपुढील आव्हान... अन्न प्रक्रियेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

>> शेतीचा विकास क्लस्टर प्रमाणे करण्याची गरज, महीला बचत गटांकडून नैसर्गिक शेती आणि त्यातील उत्पादनांचं मार्केटिंग करणारः अरुण जेटली

>> विकासदर ७.५ टक्क्यांवर जाईल अशी आशाः अर्थमंत्री

>> ४७० कृषी उत्पन्न बाजार समित्या इंटरनेटनं जोडण्यात आल्यात, इतरही जोडण्यात येत आहेत ः अर्थमंत्री

>> शेतकऱ्यांनी २७.५ दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन घेतलंय .... उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव बळीराजाला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतः अर्थमंत्री

>> जगात भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर ः अर्थमंत्री

>> मोदी सरकारच्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना ः अरुण जेटली

>> केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सादर करताहेत देशाचा अर्थसंकल्प

 

>> खासदार चिंतामण वनगा यांना लोकसभेची श्रद्धांजली... 

>> 'जनसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा असेल अर्थसंकल्प'- पंतप्रधान मोदींचे संकेत

>> केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी 

>> केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत... अर्थसंकल्पाच्या प्रतीही संसदेत पोहोचल्या...

 

>> केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी संसदेत जाण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट... 

 

टॅग्स :अर्थसंकल्प २०१८बजेट 2018 संक्षिप्तअर्थसंकल्पअरूण जेटलीनरेंद्र मोदी