Join us

९०% प्रीमिअवर लिस्ट 'हा' IPO, ₹१४०० पार पोहोचला भाव; वर्षाच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदार मालामाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:06 IST

Unimech Aerospace IPO Listing: कंपनीचा शेअर मंगळवारी बीएसईवर १,४९१ रुपयांवर लिस्ट झाला, जो ७८५ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा ९०% प्रीमियम आहे.

Unimech Aerospace IPO Listing: युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचा (UIMC) आयपीओ मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले आहेत. युनिमेक एअरोस्पेसचा शेअर बीएसईवर १,४९१ रुपयांवर लिस्ट झाला, जो ७८५ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा ९०% प्रीमियम आहे. एनएसईवर हा शेअर ८६ टक्क्यांच्या प्रीमियमसह १,४६० रुपयांवर लिस्ट झाला. या इश्यूला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

किती झालेला सबस्क्राइब?

युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचा आयपीओ २३ डिसेंबर रोजी खुला झाला आणि २६ डिसेंबर रोजी बंद झाला. अखेरच्या दिवसापर्यंत हा आयपीओ १७४.९३ पट सब्सक्राइब झाला होता. एनएसईच्या आकडेवारीनुसार, ५०० कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीपैकी ४७,०४,०२८ शेअर्स ऑफरवर होते, तर यासाठी ८२,२८,९३,०४० शेअर्ससाठी सबस्क्रिप्शन मिळालं. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा (क्यूआयबी) ३१७.६३ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा २६३.४० पट सबस्क्राइब करण्यात आला. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (आरआयआय) कोटा ५६.१६ पट सबस्क्राइब झाला.

अधिक माहिती काय?

या आयपीओमध्ये २५० कोटी रुपयांपर्यंतचे नवे इश्यू आणि २५० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश आहे. या ऑफरचा प्राइस बँड ७४५ ते ७८५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. युनिमॅक एरोस्पेस ही एक इंजिनीअरिंग सोल्यूशन्स कंपनी आहे जी एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा आणि सेमीकंडक्टर उद्योगांसाठी जटिल उत्पादन सोल्यूशन्समध्ये एक्सपर्ट आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग