Join us

विजय मल्ल्याची मालमत्ता विकण्यास ‘यूबी’चा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:05 IST

विजय मल्ल्या याची मालमत्ता विकण्याची परवानगी मागणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँक समूहाच्या अर्जास युनायटेड ब्रेवरीज (होल्डिंग्ज) लिमिटेडच्या (यूबी समूह) वतीने विरोध करण्यात आला आहे.

मुंबई : विजय मल्ल्या याची मालमत्ता विकण्याची परवानगी मागणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँक समूहाच्या अर्जास युनायटेड ब्रेवरीज (होल्डिंग्ज) लिमिटेडच्या (यूबी समूह) वतीने विरोध करण्यात आला आहे. बँकांचा अर्ज रद्द करण्याची विनंती करणारे २८ पानी उत्तर यूबीच्या वतीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात सादर करण्यात आले आहे.भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या ब्रिटनला पळून गेला आहे. त्याच्या मालमत्ता विकता याव्यात याची परवानगी मागणारा एक अर्ज एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने पीएमएलए न्यायालयात सादर केला आहे. त्यावर दिलेल्या उत्तरात यूबी समूहाने म्हटले की, बँकांची याचिका दखल घेण्याजोगी नाही.

टॅग्स :विजय मल्ल्या