Join us

Anand Mahindra: "...म्हणून मी कधीच सर्वात श्रीमंत होणार नाही", आनंद महिंद्रा यांनी सांगितलं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 13:03 IST

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एका उद्योगपतीसोबतच ते ट्विटरचा सक्रिय युजर म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहेत. ते ट्विटरवर नेहमी सक्रिय असतात आणि त्यांच्या फॉलोअर्स आणि इतर ट्विटर युजर्संनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवर जबरदस्त उत्तर दिले असून त्याच्या या उत्तराने लोकांची मने जिंकली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे मागील महिन्याच्या १० तारखेला म्हणजेच नोव्हेंबरमध्ये एका युजरने विचारले होते की, तुम्ही जगातील ७३ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तुम्ही नंबरवर कधी येणार?. 

दरम्यान, एका फॉलोअर्सने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन आनंद महिंद्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. १० नोव्हेंबरला विचारलेल्या प्रश्नाला आज आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले. त्यांनी संबंधित फॉलोअर्सच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले, "खरं तर हे आहे की मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही. कारण ही माझी इच्छा कधीच नव्हती." यावर इतर ट्विटर युजर्सनी त्यांच्या उत्तराचे कौतुक केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी जिंकली मनंखरं तर १० नोव्हेंबर रोजी आनंद महिंद्रा यांनी एका चित्रपटाची जीआयएफ शेअर केली आणि सांगितले की त्यांचे ट्विटरवर १ कोटी फॉलोअर्स आहेत. ते म्हणाले होते की, "माझ्या फॉलोअर्सची संख्या पाहिल्यावर माझी देखील अशीच प्रतिक्रिया होती. माझे कुटुंब इतके मोठे आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. (स्पष्टपणे मी कुटुंब नियोजन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे). माझ्यामध्ये स्वारस्य आणि विश्वास दाखवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." या ट्विटखाली त्या व्यक्तीने विचारले होते की, तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? याच प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी आज उत्तर देऊन सर्वांची मनं जिंकली. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :आनंद महिंद्राव्यवसायमहिंद्रा