Join us

'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:20 IST

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या रेसिप्रोकल टॅरिफचं कौतुक करताना दिसतील, परंतु अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ स्वतः उघडपणे त्यावर टीका करत आहेत. अमेरिकेच्याच एका अर्थतज्ज्ञानं ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचे पाऊल म्हटलं आहे.

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या रेसिप्रोकल टॅरिफचं कौतुक करताना दिसतील, परंतु अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ स्वतः उघडपणे त्यावर टीका करत आहेत, विशेषतः तेव्हा ज्यावेळी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे (US Tariff On India). याबद्दल कोलंबिया विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सल्लागार जेफ्री सॅक्स यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचे पाऊल म्हटलं आहे.

भारतावर कर लादल्यानंतर ब्रिक्स एकत्र

ट्रम्प टॅरिफला अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल म्हणून संबोधत अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी कठोर शब्दांत टीक केली. रशियाचं कच्चं तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त २५% कर लादण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. या निर्णयाचा अमेरिकेवरच उलटा परिणाम झाला आहे, कारण त्याने ब्रिक्स देशांच्या गटाला (BRICS) एका रात्रीत अभूतपूर्व पद्धतीनं एकत्र केलं, असंही जेफ्री म्हणाले. भारतावर कर लादल्यानंतर ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वाढत्या समन्वयाकडे लक्ष वेधत जेफ्री म्हणाले की, एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ब्रिक्सना जिंकण्यास मदत केली आहे.

Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई

भारतीयांना शिकवण मिळाली

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या अलिकडच्या निर्णयांमुळे भारताचा विश्वास तोडला आहे. त्याचे परिणाम धोरणात्मक आणि दीर्घकालीन आहेत असे ते म्हणाले. भारत हा असा देश आहे ज्याला अमेरिका प्रोत्साहन देत आहे, परंतु त्याच भारतावरील टॅरिफ हल्ल्यामुळे हा विश्वास तुटला आहे. "जरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टॅरिफ काढून टाकण्याचा निर्णय घेतला तरी भारतीयांनी असा धडा शिकला आहे की ते अमेरिकेवर पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही," असंही जेफ्री पुढे म्हणाले.

'लिंडसे ग्राहम सर्वात वाईट सिनेटर

जेफ्री यांनी अलीकडेच रशियन तेल खरेदीवरून भारताला लक्ष्य करणाऱ्या अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनाही टोला लगावला आणि त्यांच्यावर टीका करताना त्यांना अमेरिकन सिनेटमधील सर्वात वाईट सिनेटर असंही संबोधलं. अलास्कामध्ये नुकत्याच झालेल्या डोनाल्ड ट्रम्प-व्लादिमीर पुतिन भेटीबाबत, ग्राहम यांनी भारतावर नफा कमावण्याचा आरोप केला आणि रशियन राष्ट्राध्यक्षांचा अलास्काचा दौरा ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चं तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर ५०% कर लादण्याच्या धमकीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी केला.

अमेरिकेच्या माजी राजदूतांचाही इशारा

ट्रम्प यांनी भारतावर दुहेरी कर आकारणीचा हल्ला केल्यापासून त्यांच्यावर टीका होत आहे आणि तो प्रामुख्यानं अमेरिकेतूनच होत आहे. जेफ्री सॅक्स यांच्यापूर्वी माजी अमेरिकन राजदूत जेफ्री पायट यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा दिला होता आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची ट्रम्पची रणनीती भारतासोबत मजबूत आणि विश्वासार्ह भागीदारीशिवाय यशस्वी होणार नाही असंही म्हटलं होतं. भारतावर ५०% कर लादल्यानं द्विपक्षीय विश्वासावर खोलवर परिणाम झाला आहे आणि विश्वासाच्या पायाला मोठं नुकसानही झाल्याचं ते म्हणाले.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पभारतअमेरिकाटॅरिफ युद्ध