Trump Tariff India Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादलं आहे. भारतरशियाकडून तेल आणि इतर वस्तू खरेदी करत आहे. अशा तऱ्हेने युक्रेनविरुद्धच्या युद्धात भारत रशियाला आर्थिक मदत करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय. त्यामुळेच ट्रम्प यांनी भारतावर प्रचंड शुल्क लादलं आहे. आता भारतानं पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या दुखत्या नसेवर बोट ठेवलंय.
वास्तविक भारत आणि रशिया दुर्मिळ खनिजं शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी एकत्र काम करत आहेत. त्याचबरोबर जमिनीखाली कोळशापासून गॅस तयार करून आधुनिक कारखाने उभारण्याचाही त्यांचा विचार आहे. अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. या बातमीनंतर ट्रम्प यांचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही चर्चा भारत रशिया वर्किंग ग्रुप ऑन मॉडर्नायझेशन अँड इंडस्ट्रिअल कॉर्पोरेशनच्या बैठकीत झाली. ही बैठक भारत-रशिया इंटरगव्हर्मेंटल कमिशन ऑन ट्रेड, इकॉनॉमिक, सायंटिफिक, टेक्नॉलॉजिकल अँड कल्चरल को-ऑपरेशन अंतर्गत झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
कोणत्या दुर्मिळ खनिजावर चर्चा पुढे गेली?
तांबे, लिथियम, निकेल, कोबाल्ट आणि दुर्मिळ खनिजं आजकाल खूप महत्त्वाची आहेत. त्यांचा वापर पवनचक्क्या, पॉवर केबल्स, इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी यासारख्या क्लिन एनर्जीच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ते एरोस्पेस विज्ञान आणि तंत्रज्ञानात देखील एकत्र काम करतील. यामध्ये आधुनिक पवन बोगदा सुविधा बांधणं, लहान विमान इंजिनं बनवणं आणि कार्बन फायबर तंत्रज्ञान, 3D प्रिंटिंगमध्ये एकत्र काम करणं समाविष्ट आहे.
दोन्ही देश दुर्मिळ खनिजं शोधण्याचा आणि काढण्याचा, भूमिगत कोळशापासून गॅस निर्मिती करण्याचा आणि आधुनिक कारखाने उभारण्याचा विचार करत आहेत, असं मंत्रालयानं सांगितल. दोन्ही देशांनी अॅल्युमिनियम, खतं आणि रेल्वेमध्ये एकत्र काम करण्याबद्दलही चर्चा केली. दोन्ही देश खाण क्षेत्रातील उपकरणं, संशोधन आणि कचरा व्यवस्थापनात देखील एकमेकांना मदत करतील.