Join us

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देशा..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:39 IST

Trump Eyes On 150 Countries: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानपासून ब्राझील-कॅनडापर्यंत सर्व प्रमुख देशांवर शुल्क जाहीर केले आहे. १ ऑगस्टपूर्वी ते मोठी घोषणा करू शकतात.

Donald Trump Eyes On 150 Countries: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील जवळजवळ सर्वच देशांवर शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. एका अहवालानुसार, जपान, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेला 'टॅरिफ लेटर' पाठवल्यानंतर, आता ट्रम्प १५० हून अधिक देशांना अशाच प्रकारचे लेटर पाठवण्याच्या तयारीत आहेत. 

१ ऑगस्टपूर्वी शुल्क लादणार

डोनाल्ड ट्रम्प लवकरच १५० हून अधिक देशांवर नवीन शुल्क लागू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ट्रम्प म्हणाले की, आम्ही लवकरच जगातील १५० हून अधिक देशांना शुल्क देयकाबद्दल माहिती पाठवणार आहोत आणि त्यांच्यावर लागू होणारे नवीन शुल्क दर १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, हा इशारा अमेरिकेच्या व्यापार अटींवर पुन्हा चर्चा करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहेत.

'अद्याप कोणताही निर्णय नाही... पण'ट्रम्प यांनी त्यांच्या भविष्यातील टॅरिफ प्लॅनचा खुलासा करताना हेदेखील स्पष्ट केले की, ज्या १५० देशांना टॅरिफ लेटर देण्याचा विचार केला जात आहे, त्या देशांवरील टॅरिफ दर १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत निश्चित केले जाऊ शकतात. पत्रकारांशी बोलताना अमेरिकन अध्यक्षांनी असेही म्हटले की, आम्ही अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. 

ट्रम्प EU-कॅनडाबद्दल काय म्हणाले?

दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन (EU) सोबतच्या संभाव्य व्यापार करारावर आपली भूमिका अनिर्णीत ठेवली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही युरोपसोबत करार करू शकतो. दुसरीकडे, कॅनडावर लादलेल्या टॅरिफ (US Tariff On Canada) बद्दल ते म्हणाले की, त्याचे काय परिणाम होतील, हे आता सांगणे घाईचे ठरेल. ट्रम्पच्या नवीन टॅरिफ धोरणानुसार, ऑगस्टपासून कॅनडातील काही वस्तूंवर 35 टक्क्यांपर्यंत उच्च टॅरिफ जाहीर करण्यात आले आहेत.

भारताबाबत काय निर्णय घेणार?डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही शुल्क लादला होता, मात्र तो काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला. सध्या अमेरिका आणि भारत सरकार व्यापार करार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. बहुतांश गोष्टी मान्य झाल्या आहेत,काही गोष्टींवरुन अद्याप करार होऊ शकला नाही. यामध्ये दुग्ध व्यवसायाचा समावेश आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाभारतव्यवसाय