Trump Accounts : आपल्या आक्रमक धोरणांसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी मोठी घोषणा केली आहे. "मागील राष्ट्राध्यक्षांनी मुलांना केवळ कर्ज दिले, पण माझे सरकार त्यांना खरी संपत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य देईल," अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रम्प अकाउंट्स' या नवीन योजनेची घोषणा केली आहे. अमेरिकेतील मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांना शेअर बाजारशी जोडण्यासाठी ही विशेष बचत योजना आखण्यात आली असून, यामुळे अमेरिकन भांडवलशाही अधिक मजबूत होईल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
नेमकी काय आहे 'Trump Accounts' योजना?ही ट्रम्प यांच्या कर धोरणांतर्गत तयार केलेली एक विशेष बचत योजना आहे. अमेरिकेत जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या नावे हे खाते उघडता येईल. सरकार प्रत्येक बालकाच्या खात्यात सुरुवातीला १,००० डॉलर्स (सुमारे ८३,००० ते ९२,००० रुपये) जमा करेल. हा पैसा अमेरिकन शेअर बाजारातील 'इंडेक्स फंड्स'मध्ये गुंतवला जाईल, ज्यामुळे बाजाराच्या वाढीनुसार मुलांची संपत्तीही वाढत जाईल. हे पैसे मूल १८ वर्षांचे होईपर्यंत काढता येणार नाहीत. त्यानंतर उच्च शिक्षण, नवीन व्यवसाय किंवा घर खरेदीसाठी याचा वापर करता येईल.
गुंतवणुकीचे स्वरूप आणि नियम
- खाजगी बँका आणि ब्रोकरेज कंपन्या या खात्यांचे व्यवस्थापन करतील.
- टॅक्स-फ्री मर्यादा : पालकांना दरवर्षी २,५०० डॉलर्सपर्यंतची रक्कम करमुक्तपणे या खात्यात जमा करता येईल.
- इतरांचा सहभाग : नातेवाईक, मित्र किंवा सामाजिक संस्थाही यात योगदान देऊ शकतात. वर्षाला जास्तीत जास्त ५,००० डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करता येईल.
- कमी शुल्क : या खात्यांच्या व्यवस्थापनासाठी वार्षिक शुल्क केवळ ०.१०% इतके नाममात्र असेल.
कोणाला मिळणार फायदा?
- १,००० डॉलर्सचे सरकारी योगदान केवळ १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीत जन्माला येणाऱ्या अमेरिकन मुलांसाठी असेल. बालकाकडे सोशल सिक्युरिटी नंबर असणे अनिवार्य आहे.
- २०२५ पूर्वी जन्मलेल्या १८ वर्षांखालील मुलांसाठीही ही खाती उघडता येतील, मात्र त्यांना १,००० डॉलर्सचे सरकारी अनुदान मिळणार नाही.
- जुलै २०२६ पासून या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात होईल. पालक आयआरएस फॉर्म ४५४७ द्वारे किंवा ऑनलाइन पोर्टलवरून नोंदणी करू शकतील.
वाचा - आर्थिक बाजारात खळबळ! डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, बाजारही गडगडला
भांडवलशाहीचे लोकशाहीकरण?
ट्रम्प यांच्या समर्थकांच्या मते, या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलांनाही शेअर बाजाराचा फायदा मिळेल आणि ते भविष्यात श्रीमंत होऊ शकतील. "कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पिढीला आर्थिक स्वातंत्र्य देण्याचा हा मार्ग आहे," असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
Web Summary : Trump's 'Trump Accounts' plan aims to give children financial freedom. The government will invest $1,000 in each child's account, growing with the stock market. This will democratize capitalism, empowering future generations.
Web Summary : ट्रम्प की 'ट्रम्प अकाउंट्स' योजना का उद्देश्य बच्चों को वित्तीय स्वतंत्रता देना है। सरकार प्रत्येक बच्चे के खाते में $1,000 का निवेश करेगी, जो शेयर बाजार के साथ बढ़ेगा। इससे पूंजीवाद का लोकतंत्रीकरण होगा, भविष्य की पीढ़ियों को सशक्त बनाया जाएगा।