Join us

PF खातं ट्रान्सफर करणं झालं सोपं; कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पाहा संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:31 IST

PF Account Transfer Process : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे.

PF Account Transfer Process : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. ईपीएफओनं बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, काही प्रकरणांमध्ये पीएफ खाते हस्तांतरणासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीकडून ऑनलाइन अर्ज पाठविण्याची गरज भासणार नाही. ईपीएफ खात्यासाठी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मूळ वेतनातील १२ टक्के रक्कम दिली जाते. त्याचबरोबर कंपनी कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यातही तेवढीच रक्कम जमा करते.

कंपनीनं जमा केलेल्या पैशांपैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएस (एम्प्लॉई पेन्शन स्कीम) मध्ये जाते, तर उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते. ईपीएफओचे कोट्यवधी ग्राहक आहेत. ईपीएफओनं १५ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पीएफ खातं ट्रान्सफरसाठी जुन्या किंवा नवीन कंपनीकडून ऑनलाइन अर्ज पाठविण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच ग्राहक स्वत: अकाऊंट ट्रान्सफरसाठी क्लेम करू शकतील. कोणाला मिळणार फायदा? क्लिक करा.

सर्व प्रकरणांमध्ये, यूएएन आधारशी जोडल्यास आणि वैयक्तिक तपशील जुळविल्यास नियोक्त्याच्या पडताळणीशिवाय पीएफ हस्तांतरण जलद होईल.

यूएएन म्हणजे काय?

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा १२ अंकी क्रमांक आहे जो कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) हा नंबर जारी करते.

ईपीएफ यूएएन आधारशी कसं लिंक कराल?

स्टेप १: मेंबर ई-सेवा वेबसाइटला भेट द्या आणि यूएएन लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरुन आपल्या ईपीएफ खात्यात लॉग इन करा.स्टेप २: 'मॅनेज' मेन्यू अंतर्गत केवायसी पर्यायावर क्लिक करा.स्टेप ३: आधार सिलेक्ट करा आणि तुमचे आधार डिटेल्स टाका.स्टेप ४: सेव्हवर क्लिक करा.स्टेप ५: यूआयडीएआय डेटाचा वापर करून तुमचं आधार प्रमाणित केलं जाईल.स्टेप ६: केवायसी पूर्ण झाल्यानंतर आधार ईपीएफ खात्याशी लिंक होईल.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीगुंतवणूक