मुंबई : नोटाबंदीनंतर काही महिन्यांत पुन्हा रोखीने व्यवहार करण्यामध्ये मोठी वाढ झालेली असली, तरीही अशा प्रकारे व्यवहार केल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने असे व्यवहार करणाऱ्यांसाठी सक्त ताकीद दिली असून रोखविरहीत व्यवहार करण्याचे आवाहनही केले आहे. यामुळे जर तुम्हीही रोखीने व्यवहार करत असाल तर हे चार नियम लक्षात ठेवायलाच हवेत. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेलच परंतू याचबरोबर कायदेशीर कारवाईलाही समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काय आहेत हे चार नियम...चला पाहूया...
पहिला नियम : दोन लाखांची रोख स्विकारू नका आयकर विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यामध्ये एका दिवसात एका व्यक्तीकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊ नये. ही रक्कम एका व्यवहारात असो किंवा अधिक. असे केल्यास दंड भरावा लागू शकतो.
दुसरा नियम : अचल संपत्तीसाठी 20 हजारांपेक्षा जास्त कॅश नकोअचल संपत्तीच्या घेव-देवीच्या व्यवहारांसाठी तुम्हाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने नाही घ्यायला हवी नाही द्यालया हवी. असे केल्यास दंड भरावा लागू शकतो.