Success Story: जगात अनेक लोक आपल्या नशिबाला दोष देतात, पण काही लोक असे असतात जे स्वतःच्या हातानं स्वतःचं नशीब घडवतात. 'लेन्स टेक्नॉलॉजी'च्या (Lens Technology) संस्थापिका झोऊ क्यूयू फे या अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. चीनमधील एका दुर्गम गावात जन्मलेल्या झोऊ यांना बालपणापासूनच पावलोपावली आव्हानांचा सामना करावा लागला.
मात्र, त्यांनी हार मानण्याऐवजी जिद्द दाखवली आणि आज असं स्थान मिळवलं ज्याची कल्पना करणंही अनेकांसाठी कठीण आहे. आज त्यांची कंपनी ॲपल (Apple), सॅमसंग (Samsung) आणि हुवावे (Huawei) सारख्या जगातील दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांना स्क्रीन पुरवठा करते. झोऊ यांची संपत्ती (Net Worth) आज सुमारे ६० हजार कोटी रुपये आहे.
आईचं छत्र हरपलं आणि...
झोऊ यांचा जन्म १९७० मध्ये चीनच्या हुनान प्रांतातील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. नियतीनं त्यांच्या लहानपणापासूनच परीक्षा घेण्यास सुरुवात केली होती. त्या अवघ्या ५ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचे वडील लाकूड कारागीर होते, मात्र एका अपघातात त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली आणि त्यांची बोटंही कापली गेली. घराची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की झोऊ यांना लहान वयातच शाळा सोडावी लागली. ज्या वयात मुले खेळण्या-बागडण्यात आणि अभ्यासात व्यस्त असतात, तिथे झोऊ घराचं काम सांभाळत आणि आपल्या अंध वडिलांची काळजी घेत असत. पण शिकण्याची ओढ इतकी होती की, दिवसभर काम केल्यानंतर त्या रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात पुस्तके वाचायच्या.
१६ व्या वर्षी गाव सोडलं
घरातील परिस्थिती अधिकच बिकट झाल्यावर वयाच्या १६ व्या वर्षी झोऊ यांनी आपलं गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. चांगल्या भविष्याच्या शोधात त्या शेन्झेन (Shenzhen) येथे गेल्या. तिथे त्यांना घड्याळाची काच (Watch Lens) बनवणाऱ्या कारखान्यात मजुरी मिळाली. त्या दिवसातून १२-१२ तास काम करायच्या, पण त्या केवळ पैसे कमवण्यासाठी नव्हे तर काम शिकण्यासाठी तिथे आल्या होत्या. झोऊ यांनी तिथे कामातील बारकावे समजून घेतले आणि १९९३ मध्ये सुमारे ५०० डॉलर्सची बचत करून आपल्या भावंडांच्या मदतीनं स्वतःची एक छोटं वर्कशॉप सुरू केलं. हीच ती पायाभरणी होती, ज्यानं पुढे अब्जावधी डॉलर्सच्या साम्राज्याचं रूप घेतलं.
Web Summary : Zhou Qunfei, founder of Lens Technology, overcame poverty and hardship in rural China. She started in a watch lens factory and now supplies screens to tech giants like Apple and Samsung. Her net worth is around ₹60,000 crores.
Web Summary : लेन्स टेक्नोलॉजी की संस्थापक झोउ कुनफेई ने चीन के ग्रामीण इलाकों में गरीबी और कठिनाइयों को पार किया। एक घड़ी लेंस कारखाने से शुरुआत कर, अब वे एप्पल और सैमसंग जैसी तकनीकी दिग्गजों को स्क्रीन की आपूर्ति करती हैं। उनकी संपत्ति लगभग ₹60,000 करोड़ है।