Join us

गुजरात टायटन्स खरेदी करण्यात अदानींना अपयश; या गुजराती व्यक्तीने हिसकावली IPLची सर्वात मोठी डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:44 IST

Adani Group : वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायचा विस्तार करणाऱ्या अदानी समूहाला आयपीएल संघ विकत घेण्यात अपयश आलं आहे. टोरेंट समूहाने हा गुजरात टायटन्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे.

Gujarat Titans IPL Team : अब्जाधीश गौतम अदानी आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करत आहेत. विजेपासून विमानतळापर्यंत आणि सिमेंटपासून उर्जा निर्मितीपर्यंत अनेक क्षेत्रात अदानी समूह कार्यरत आहेत. एवढेच काय तर माध्यम क्षेत्रातही ते मागे राहिले नाहीत. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमधील संघ घेण्यात ते अपयशी ठरले आहेत. टोरेंट समूहाने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील मोठा हिस्सा ताब्यात घेण्याची घोषणा केली. ही डीलची अधिकृत किंमत समोर आली नाही. पण, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये ५००० कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाल्याचा दावा करण्यात  झाली आहे.

गुजरात टाइटन्सची मालकी टोरेंट समूहाकडेटोरेंट समूहाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कराराविषयी माहिती देण्यात आली आहे. समूहाच्या मालकीची टोरेंट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडने सीवीसी कॅपिटल पार्टनर्स (Irelia Sports India Private Limited) ने IPL फ्रेंचायझी गुजरात टायटन्समध्ये ६७ टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी करार केला आहे.' बीसीसीआयच्या मान्यतेनंतर या व्यवहार मूर्त स्वरुप मिळणार आहे. या करारानंतर, गुजरात टाइटन्समध्ये इरेलियाचा आता फक्त ३३ टक्के हिस्सा राहील. या करारामुळे टोरेंट समूहाने भारताच्या वेगाने वाढणाऱ्या क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे अदानी समूहाची ही संधी हुकली आहे.

या कराराबद्दल माहिती देताना टोरेंट समूहाचे संचालक जिनल मेहता म्हणाले, 'भारतात क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, भविष्यात यात आणखी भर पडणार असल्याने टोरेंटने ही संधी घेण्याचा निर्णय घेतला.' अदानी समूह आणि टोरेंट समूहाला २०२१ मध्ये अहमदाबादची आयपीएल टीम गुजरात टायटन्स खरेदी करण्याची संधी होती. यानंतर गुजरात टायटन्समध्ये हिस्सेदारी घेण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू होते.

गुजरात संघ खरेदी करण्यासाठी अदानी-टोरेंट समूहात चढाओढबीसीसीआयने गुजरात टायटन्सला फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यांचा हिस्सा विकण्यास प्रतिबंध केल्याने हा करार लांबला. त्यामुळेच या कराराची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सुमारे ७ महिन्यांनी हा करार अंतिम झाल्याची माहिती देण्यात आली. नफा कमावल्यानंतर सीव्हीसी कॅपिटलनेही आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न केला होता. २०२१ मध्ये, बीसीसीआयने आयपीएलमध्ये २ नवीन शहर-आधारित संघ सामील होण्यासाठी बोली लावली होती. अहमदाबाद हे शहर सर्वाधिक चर्चेत होते. त्यावेळी अदानी समूहाने ५१०० कोटींची तर टोरेंट समूहाने ४६५३ कोटींची बोली लावली होती.

टॅग्स :गौतम अदानीगुजरात टायटन्सअदानीआयपीएल २०२४