Join us

२०२४ मध्ये 'या' १० आयपीओंनी बुडवले गुंतवणूकदारांचे पैसे! लिस्टिंगच्या दिवशीच दिला दगा; एकतर होता सर्वात मोठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:49 IST

Top 10 Worst IPOs of 2024 : २०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या वर्षात अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात आणले. त्यात अनेकांनी मालामाल केलं पण काहींना मात्र गुंतवणूकदारांना निराश केलं.

Top 10 Worst IPOs of 2024 : आयपीओ म्हणजे पैसे कमावण्याची सुवर्णसंधी मानली जाते. इतिहास पाहिला तर १० पैकी ७ आयपीओंनी चांगला परतावा दिला आहे. २०२४ वर्षात प्राथमिक बाजारात नवीन आयपीओंची लाट पाहायला मिळाली. विभोर स्टील, बीएलएस ई-सर्व्हिसेस, बजाज हाऊसिंग फायनान्स यासारख्या अनेक कंपन्यांच्या आयपीओने लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. त्याचवेळी, अनेक कंपन्यांच्या आयपीओ गुंतवणूकदारांना घेऊन बुडाले. २०२४ चे असे १० आयपीओ, ज्यात गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी सर्वाधिक नुकसान झाले.

  1. दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचा IPO २८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. २६० कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत २०३ रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना २०.२० टक्के नुकसान सोसावे लागले.
  2. JG केमिकल्स लिमिटेडचा IPO १३ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. २५१.२ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत २२१ रुपये होती. मात्र, याने गुंतवणूकदारांची निराशा केली असून १६.४० टक्के नुकसान सोसावे लागले.
  3. एसीएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेडचा IPO १३ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. २९०० कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत २८९ रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना १२.४० टक्के तोटा झाला.
  4. जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा IPO १४ फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला होता. ५७० कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत ४१४ रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना ११.१० टक्के नुकसान सोसावे लागले.
  5. Epack Durables Limited चा IPO ३० जानेवारी रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. ६४० कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत २३० रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना ९.७० टक्के नुकसान सहन करावे लागले.
  6. गोपाल स्नॅक्स लिमिटेडचा IPO १४ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. ६५० कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत ४०१ रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना ९.६० टक्क्यांचा तोटा झाला.
  7. आरके स्वामी लिमिटेडचा आयपीओ १२ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. ४२३.६ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत २८८ रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना ८.८० टक्के नुकसान सोसावे लागले.
  8. Antero Healthcare Solutions Limited चा IPO १६ फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. १६०० कोटी रुपयांच्या इश्यू आकारासह IPO ची इश्यू किंमत १२५८ रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना ८.६० टक्के नुकसान सोसावे लागले.
  9. वेस्टर्न कॅरियर्स (इंडिया) लिमिटेडचा IPO २४ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. ४९२.९ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत १७२ रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना ७.३० टक्क्यांचे लिस्टिंग नुकसान सहन करावे लागले.
  10. Hyundai Motor India Limited चा IPO २२ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. २७८७०.२ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या IPO ची इश्यू किंमत १९६० रुपये होती. ज्यावर गुंतवणूकदारांना ७.२० टक्क्यांचा तोटा सहन करावा लागला. 
टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगइयर एंडर 2024शेअर बाजार