Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेट क्लीनरच्या बाटलीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात, दोन बड्या कंपन्या आमने-सामने, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:25 IST

Toilet Cleaner Bottle Dispute : टॉयलेट क्लीनरच्या बाटलीवरून देशातील दोन बड्या कंपन्या आमने सामने आल्याचे सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे खरे आहे. टॉयलेट क्लीनरच्या बाटलीवरून हार्पिक आणि गोदरेज ह्या कंपन्या समोरा-समोर आल्या असून, सदर प्रकरण सुप्रिम कोर्टात पोहोचलं आहे.

टॉयलेट क्लीनरच्या बाटलीवरून देशातील दोन बड्या कंपन्या आमने सामने आल्याचे सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे खरे आहे. टॉयलेट क्लीनरच्या बाटलीवरून हार्पिक आणि गोदरेज ह्या कंपन्या समोरा-समोर आल्या असून, सदर प्रकरण सुप्रिम कोर्टात पोहोचलं आहे. घराघरातील टॉयलेटमध्ये दिसणारी आणि वापरल्यानंतर कचऱ्यात फेकली जाणारी टॉयलेट क्लीनरची बाटली दोन कंपन्यांमध्ये ओळखीचा मुद्दा बनली आहे.

त्याचं झालं काय की, निळ्या रंगाची आणि वरून एका बाजूने वाकलेली लाल झाकण असलेली हार्पिकची टॉयलेट क्लीनरची बाटली तुम्ही पाहिली असेलच. आता या हार्पिकच्या टॉयलेट क्लीनरच्या बाटलीच्या डिझाइनशी मिळत्या जुळत्या डिझाईनच्या बाटलीमधून गोदरेजनेही Spic नावाचं टॉयलेट क्लीनर बाजारात आणलं. यावरूनच दोन्ही कंपन्यांमध्ये वाद झाला आणि हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. दरम्यान, हार्पिक आणि गोदरेज या दोन्ही कंपन्या आपापली डिझाईन ही आपली अस्सल डिझाईन असल्याचे सांगून आमने सामने आल्या आहेत.

या वादामधून ट्रेडमार्क आणि डिझाईनच्या कॉपीराईटबाबतचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हार्पिकची मूळ कंपनी असलेल्या Reckitt Benckiser ने मानेकडे वाकलेली डिझाईन असलेली बाटली लॉन्च केली होती. ही कंपनी १९८४ पासून आपले प्रॉडक्ट विकत असून, २००२ साली आपली डिझाईन रजिस्टर केली होती. त्याचा क्रमांक 191291 हा आहे.  तर दुसरीकडे गोदरेजनेही आता Spic नावाचं टॉयलेट क्लीनर बाजारात आणलं आहे.

त्यामुळे गोदरेजने डिझाईन कॉपी करून ग्राहकांची दिशाभूल केली आहे, असा दावा हार्पिककडून करण्यात येत आहे. तर या डिझाईनचं रजिस्ट्रेशन संपलं असून, आता हार्पिक आपला एकाधिकार दाखवू शकत नाही, असा युक्तिवाद गोदरेजकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी कोर्टाकडून काय निर्णय दिला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Toilet cleaner bottle design dispute between Harpic and Godrej reaches Supreme Court.

Web Summary : Harpic and Godrej are in a Supreme Court battle over toilet cleaner bottle design. Harpic claims Godrej copied their design, while Godrej argues the design registration has expired. The court's decision is awaited.
टॅग्स :सर्वोच्च न्यायालयव्यवसाय