मुंबईः जर आपण या दिवसांत सोने खरेदी करण्याचा विचार करत असल्यास चांगली गोष्ट आहे. तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठ घट झाली आहे. प्रति 10 ग्रॅमसाठी तीन दिवसांत सोन्याच्या दरात 500 रुपयांची कपात नोंदवली गेली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममध्ये 50 रुपयांची घट झाली असून, त्यासाठी आपल्याला 32,670 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचा दर प्रतिकिलो 37,350 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी घटल्यानं आणि रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्यानं सोन्याचे भाव गडगडले आहेत. दोन दिवसांपूर्वीच सोन्याचे भाव 300 रुपयांनी गडगडले असून, प्रति 10 ग्रॅमसाठी 32870 रुपये मोजावे लागत होते. तर मंगळवारी सोन्याचे दर घटून 50 रुपयांनी खाली आले आहेत. आता प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 32,670 रुपये मोजावे लागत आहेत. तीन दिवसांत सोन्यात 500 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोने आणि चांदीचे दर घटले असून, त्यांचा प्रभाव आंतरराष्ट्रीय बाजारावर पडला आहे.एकीकडे दुष्काळ असला तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यातच आता दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसांपूर्वी 160 रुपयांनी पडला होता, तेव्हा 33,170 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागत होते. अखिल भारतीय सराफा संघ यांच्यामते, औद्योगिक युनिट आणि नाणे उत्पादनात झालेली घट यामुळे चांदीच्या भावात 625 रुपयांचं नुकसान झालं असून, चांदीचं नाणं प्रतिकिलोग्राम 37,625 रुपयांवर आलं आहे.
आनंदवार्ता ! तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घट, 10 ग्रॅमसाठी आता मोजा एवढे पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:30 IST