Join us

टायर कंपनीचा ₹72 चा शेअर ₹11 वर आला; आता गुंतवणूकदार तुटून पडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:24 IST

Tirupati Tyres Ltd. Penny Stock: कंपनीच्या शेअरमध्ये आज 5% चा अप्पर सर्किट लागला.

Tirupati Tyres Ltd. Penny Stock: आज(गुरुवारी) सकाळी शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंगमुळे बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 242.01 अंकांनी घसरुन 79,784.48 वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 72.3 अंकांनी घसरुन 24,256.65 वर बंद झाला. या दरम्यान, एका पेनी स्टॉकमध्ये जोरदार तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअर्समध्ये आज 5% चा अप्पर सर्किट लागला अन् शेअरने 11.65 रुपयांचा उच्चांक गाठला. 

कंपनी कर्जमुक्तआम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत, तो तिरुपती टायर्स लिमिटेडचा आहे. ही टायर कंपनी सप्टेंबर 2024 पर्यंत कर्जमुक्त आहे. कंपनीने राईट्स इश्यूची घोषणा केली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राईट इश्यू कमिटीच्या बैठकीनुसार, कंपनीचा राईट इश्यू शुक्रवार( 25 एप्रिल 2025) रोजी उघडणार होता अन् शनिवार(03 मे 2025) रोजी बंद होणार होता. पण, आता हा सोमवार(05 मे 2025) रोजी बंद होईल. कंपनीचे राईट इश्यूद्वारे 49 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 4,88,87,000 शेअर्स 10 रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीवर जारी करेल.

कंपनीच्या शेअर्सची स्थितीतिरुपती टायर्स लिमिटेडच्या स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 22% ने वाढले. तर, एका महिन्यात 30०% ने वाढ झाली. तर, एका वर्षात हा स्टॉक  83% घसरलाही आहे. या काळात त्याची किंमत 69 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत घसरली आहे. या वर्षीही आतापर्यंत त्यात 13% पर्यंत घट झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत सुमारे 72 रुपये आहे. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकव्यवसाय