नवी दिल्ली - केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ इंडियासह एकूण १५ बड्या बँकांना मार्च २०२९ पर्यंत सोने आणि चांदी आयातीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे सीमा शुल्क विभागात अडकून पडलेला हजारो टन मौल्यवान धातूचा साठाही आता खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी या बँकांना आयातीचे अधिकार देण्यात आले आहेत. सुमारे ५ टन सोने आणि ८ टन चांदी सीमा शुल्क विभागात अडकून पडलेली आहे.
टंचाई दूर होणार, रुपयाला बळ मिळणारभारत हा सोन्याचा जगातील दुसरा सर्वांत मोठा ग्राहक आहे. नवीन आयातीला परवानगी मिळाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची उपलब्धता वाढणार आहे. सोन्याच्या आयातीवर नियंत्रण राहिल्याने देशातील व्यापार तूट कमी होण्यासही मदत होणार असून, कमकुवत होत असलेल्या रुपयालाही यामुळे काहीसा दिलासा मिळेल.
Web Summary : Government authorizes 15 banks, including SBI and HDFC, to import gold and silver until March 2029, potentially releasing tonnes of precious metals stuck in customs. This boosts availability, curbs trade deficit, and strengthens the rupee.
Web Summary : केंद्र सरकार ने एसबीआई, एचडीएफसी सहित 15 बैंकों को मार्च 2029 तक सोना-चांदी आयात की अनुमति दी। इससे सीमा शुल्क में फंसा हजारों टन धातु का भंडार खुलेगा, उपलब्धता बढ़ेगी, व्यापार घाटा कम होगा, और रुपया मजबूत होगा।