शेअर बाजारातील 'मोतीसन्स ज्वेलर्स'च्या (Motisons Jewellers) शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या केवळ दोनच वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या शेअरचे १० भागांमध्ये विभाजन (Stock Split) केले. यामुळे आता गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये आला होता आयपीओ - मोतीसन्स ज्वेलर्सचा आयपीओ डिसेंबर २०२३ मध्ये आला होता. त्यावेळी कंपनीने ५२ ते ५५ रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड निश्चित केला होता. गुंतवणूकदारांना किमान २५० शेअर्सचा एक लॉट खरेदी करण्यासाठी १३,७५० रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक होते.
शेअर विभाजनाचा फायदा -२०२४ मध्ये कंपनीने आपल्या शेअर्सचे १० भागांत विभाजन केले, यामुळे दर्शनी मूल्य (Face Value) १० रुपयांवरून १ रुपया झाले. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये २५० शेअर्स मिळाले होते, त्यांच्या शेअर्सची संख्या विभाजनानंतर २,५०० झाली आहे. सध्या हा शेअर १५.८० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. यामूळ १३,७५० रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता ३९,५०० रुपये झाले असेल.
अशी आहे शेअरची स्थिती -शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १५.७२ रुपयांवर दिसत होता. यात १.५७ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. गेल्या सहा महिन्यांत शेअरमध्ये २० टक्क्यांची तर एका वर्षात १४ टक्क्यांची घट झाली आहे. शेअरहोल्डिंगनुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ६६ टक्के, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा हिस्सा ३४ टक्के एवढा होता.
दरम्यान, डिसेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी दमदार राहिली. एकूण विक्री १७४.५६ कोटी रुपये झाली आहे, जी वार्षिक आधारवर २०.१३ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कंपनीने २५.९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
Web Summary : Motisons Jewellers' stock surged, delivering over 200% returns in two months. A stock split increased investor share count. IPO in December 2023. December quarter sales strong.
Web Summary : मोतीसन्स ज्वेलर्स के शेयर ने दो महीने में 200% से अधिक का रिटर्न दिया। स्टॉक विभाजन से निवेशकों के शेयर बढ़े। दिसंबर 2023 में आईपीओ आया। दिसंबर तिमाही में बिक्री में तेजी।