Join us

जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:14 IST

एकीकडे खासगी कंपन्या बंपर नफा कमावूनही आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्यात कंजूसपणा करताना दिसतात. अशातच एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना मात्र मोठं गिफ्ट दिलंय.

एकीकडे खासगी कंपन्या बंपर नफा कमावूनही आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्यात कंजूसपणा करताना दिसतात. अशातच सिंगापूरच्या कंपनीनं सर्व कर्मचाऱ्यांना ७ महिन्यांचे वेतन बोनस म्हणून दिल्याची माहिती समोर आलीये. गेल्या आर्थिक वर्षात बंपर नफा झाल्यानंतर कंपनीनं हे पाऊल उचललंय. 'आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे इतका नफा झाला आहे. त्यामुळे आपला नफा कर्मचाऱ्यांसोबत वाटून घेणं म्हणजे त्यांना त्यांचे हक्क देण्यासारखं आहे,' असं कंपनीनं म्हटलंय.

सिंगापूर एअरलाइन्सनं आपल्या कर्मचाऱ्यांना ७.४५ महिन्यांचा प्रॉफिट शेअरिंग बोनस जाहीर केला आहे. कंपनीनं वर्षभरात २.७८ अब्ज डॉलर (सुमारे २६,००० कोटी रुपये) निव्वळ नफा कमावला. हा नफा बाजार तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. हा बोनस गेल्या वर्षीच्या ७.९४ महिन्यांच्या वेतन देयकापेक्षा किंचित कमी असला तरी त्यातून कंपनीचं निरंतर नफा उत्पन्न आणि १९.५ अब्ज डॉलर (सुमारे १७,००० कोटी रुपये) विक्रमी उत्पन्न दिसून येतं.

UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

सावध पवित्रा

कंपनीच्या कमाईचे सकारात्मक परिणाम असूनही विमान कंपनीनं सावध पवित्रा घेतलाय. जागतिक व्यापार तणाव, विशेषत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या शुल्क धोरणांमुळे निर्माण झालेली आव्हानं लोकांना त्यांचा विमान प्रवास कमी करण्यास भाग पाडू शकतात, असा इशारा या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. आर्थिक आणि भूराजकीय अनिश्चिततेमुळे प्रवासी आणि कार्गो बाजारावर होणाऱ्या परिणामाबद्दलही एअरलाइन्सनं भीती व्यक्त केली आहे.

४ कोटी लोकांचा प्रवास

सिंगापूर एअरलाइन्सनं गेल्या वर्षी विक्रमी ३.९४ कोटी प्रवाशांची वाहतूक केली होती. विमान वाहतूक क्षेत्रातील बड्या कंपन्यांसह या विमान कंपनीनं स्वत:चा विस्तारही केला आहे. मात्र, एकरकमी नफा वगळता त्यांचा समायोजित निव्वळ नफा ३७ टक्क्यांनी घसरून १.७ अब्ज डॉलरवर आला आहे. बदलत्या व्यापार धोरणांमुळे भविष्यात उद्योगाच्या कामगिरीवर कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

एअर इंडियाचा मोठा वाटा

सिंगापूर एअरलाइन्सच्या या नफ्यात भारतीय कंपनी एअर इंडियाचाही मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी एअर इंडियात विलीन झालेल्या विस्तारामध्ये सिंगापूर एअरलाइन्सचा ४९ टक्के हिस्सा आहे. समूहाच्या उत्पन्नात २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेमुळे कार्गो सेवेची मागणीही वाढली आणि कार्गोमधून मिळणाऱ्या उत्पन्नात ४.४ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, वाढत्या स्पर्धेमुळे मालवाहतुकीच्या दरात ७.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. खर्चात वाढ झाल्यानं कंपनीच्या ऑपरेशनल नफ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे कंपनीचा ऑपरेटिंग नफा ३७% घसरून १.७१ अब्ज डॉलरवर आला.

टॅग्स :सिंगापूरएअर इंडिया