Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशानं भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री बंद करण्याचा घेतला निर्णय, हे आहे मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 14:25 IST

१ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. २०१७ मध्ये व्हिसा फ्री एन्ट्रीला सुरूवात करण्यात आली होती.

इलिगल मायग्रेशनवर नियंत्रण करणं आणि युरोपिय व्हिसा पॉलिसीचं पालन करण्यासाठी सर्बियाच्या सरकारनं भारतीयांसाठी व्हिसा फ्री ट्रॅव्हल संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, १ जानेवारी २०२३ पासून भारतीयपासपोर्टधारकांना आता वैध व्हिसाशिवाय सर्बियामध्ये प्रवास करण्याची मुभा नसेल.

यापूर्वी, राजनैतिक आणि अधिकारीक भारतीय पासपोर्ट धारकांना ९० दिवसांसाठी व्हिसाशिवाय देशात येण्याची परवानगी होती, तर सामान्य पासपोर्ट धारकांसाठी हा कालावधी ३० दिवसांचा होता. एका निवेदनात सरकारने म्हटले आहे की सर्बियामध्ये ३० दिवसांपर्यंत राहण्यासाठी सर्व भारतीय पासपोर्ट धारकांसाठी सर्बियामध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची विद्यमान व्यवस्था मागे घेण्यात आली आहे.

पाच वर्षांपासून होती व्हिसा फ्री एन्ट्रीसर्बियाने सप्टेंबर २०१७ मध्ये व्हिसा-फ्री प्रवेश सुरू केला होता. सर्बियाला जाणारे भारतीय सर्बियातील व्हिसा-फ्री प्रवेशाच्या आधारावर सर्बियाच्या शेजारील देशांसह इतर युरोपीय देशांमध्ये प्रवास करू शकत नाहीत. सर्बिया सरकारच्या घोषणेनंतर, बेलग्रेड येथील भारतीय दूतावास, सर्बियाने भारतीय नागरिकांना व्हिसा नियमांमधील बदलाविषयी माहिती जारी केली आहे. १ जानेवारी २०२३ पासून सर्बियामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व भारतीयांना एन्ट्रीसाठी व्हिसाची आवश्यकता असेल.

टॅग्स :भारतपासपोर्ट