Join us
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात बंपर परतावा! ₹६ च्या शेअरनं दिला ६४००% परतावा, एक लाखाचे केले ₹६५ लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:22 IST

ही कंपनी प्रामुख्याने शेअर्स, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच कर्ज पुरवठ्याचे काम करते.

नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) 'ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'च्या शेअरमध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी दिसून आली. व्यवहारादरम्यान हा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ४५० रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा वर्षांत या शेअरने ६.६० रुपयांवरून ४३० रुपयांपर्यंत मजल मारत गुंतवणूकदारांना ६४००% इतका बंपर परतावा दिला आहे. या वर्षात हा शेअर ६८३.५० रुपयांच्या ऑल टाइम उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र बाजारातील विक्रीमुळे तो सध्या काहीसा खाली आला आहे.

गुंतवणूकदारांची संपत्ती वधारली -जर एखाद्या गुंतवणूकदाराने मार्च २०२१ मध्ये या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणून केली असतील, तर आता तिचे मूल्य ६५ लाख रुपये झाले असते. ऑक्टोबर २०२१ मधील 'स्टॉक स्प्लिट' (१:१०) आणि जानेवारी २०२४ मधील 'बोनस शेअर्स' (४:१) यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.

तिमाही कामगिरी आणि प्रवर्तक -कंपनीचा डिसेंबर २०२५ चा तिमाही नफा १६८ कोटी रुपये राहिला असून महसुलातही घट झाली आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ६५.३० टक्के हिस्सा प्रमोटर्सकडे असून, अल्पना संजय डांगीकडे ५५,४५,४५,३०० शेअर्स आहेत, अर्थात प्रमोटरचा ६५.३०% हिस्सा आहे. मेंटर कॅपिटल लिमिटेडकडे ३.४९% हिस्सा आहे, म्हणजेच २,९६,४८,१३५ शेअर्स आहेत.

ही कंपनी प्रामुख्याने शेअर्स, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच कर्ज पुरवठ्याचे काम करते.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹6 Share Soars, Delivers 6400% Return, Turns Lakh into ₹65 Lakh!

Web Summary : Authum Investment's share surged, yielding a 6400% return in six years. A ₹1 lakh investment in March 2021 would now be ₹65 lakh, boosted by stock splits and bonus shares. December's quarterly profit was ₹168 crore.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकस्टॉक मार्केट