Join us  

ग्रॅच्युईटीच्या नियमातही होणार मोठा बदल; जाणून घ्या, ग्रॅच्युईटी काय असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:25 AM

नवीन वेतन संहिता १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या संहितेनुसार जो कर्मचारी नोकरीमध्ये एक वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, तो ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरेल. पूर्वी नोकरीत पाच वर्षे पूर्ण झाली की मग ग्रॅच्युईटीसाठी कर्मचारी पात्र ठरत असे.

नोकरीच्या ठिकाणावर सलग पाच वर्षे काम केल्यानंतर संबंधित कर्मचारी ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरतो. मात्र, आता नवीन कामगार वेतन संहिता लागू झाल्यावर पाच वर्षांऐवजी नोकरीमध्ये एक वर्ष पूर्ण केल्यानंतरही ग्रॅच्युईटीसाठी कर्मचारी पात्र ठरू शकणार आहे.

ग्रॅच्युईटी काय असते ?- एखाद्या कंपनीत वा संस्थेत कर्मचारी दीर्घ कालावधीसाठी काम करत असेल तर त्याला वेतन, निवृत्तिवेतन व भविष्य निर्वाह निधी यांव्यतिरिक्त ग्रॅच्युईटीही मिळते.- ग्रॅच्युईटी म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याला कंपनी वा संस्थेकडून मिळणारे बक्षीसच असते. सध्याच्या कायद्यानुसार सलग पाच वर्षे एका संस्थेत काम करणाऱ्यालाच ग्रॅच्युईटीचा हक्क प्राप्त होतो.

एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला किंवा त्यास अपंगत्व आले तर अशा स्थितीत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला वा कर्मचाऱ्याला पाच वर्षांच्या आधीही ग्रॅच्युईटी मिळू शकते.

नवीन वेतन संहिता १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या संहितेनुसार जो कर्मचारी नोकरीमध्ये एक वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, तो ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरेल. पूर्वी नोकरीत पाच वर्षे पूर्ण झाली की मग ग्रॅच्युईटीसाठी कर्मचारी पात्र ठरत असे.

- कंपनी वा संस्थेत किती वर्षांपर्यंत सेवा केली आहे- अखेरच्या कालावधीत मिळणारे वेतन

उदाहरणार्थ : एखाद्या व्यक्तीने कंपनी वा संस्थेत सलग पाच वर्षे काम केले असेल आणि त्याचे अखेरच्या काळातील एकूण वेतन २० हजार रुपये आहे. महिन्यातील चार साप्ताहिक सुट्ट्या वगळून हे गणन केले आहे. त्यामुळे एका वर्षातील १५ दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युईटीचे गणन होते.

तर त्या व्यक्तीची ग्रॅच्युईटी अशी असेल -२०००० X १५/२६ X ५ X २०००० X २.८८एवढी त्या कर्मचाऱ्याची ग्रॅच्युईटीची रक्कम असेल. 

टॅग्स :कर्मचारीपैसा