Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही

यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही

इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 02:22 AM2021-01-12T02:22:17+5:302021-01-12T02:22:55+5:30

इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाई नाही

There is no printing of the budget this year | यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही

यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही

Highlights‘नाॅर्थ ब्लाॅक’मध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापण्यासाठी स्वतंत्र छापखाना आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति छापल्यानंतर त्या सीलबंद करून वितरण हाेईपर्यंत संबंधित १००हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी याच ठिकाणी राहतात,

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या काउंटडाउनला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमसाठी यंदाचा अर्थसंकल्प खूप आव्हानात्मक राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात एक गाेष्ट मात्र काही प्रथा आणि पायंडा माेडणारी राहणार आहे. यावेळी अर्थसंकल्पाच्या प्रति छापण्यात येणार नसून, पारंपरिक हलवा बनविण्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. 

‘नाॅर्थ ब्लाॅक’मध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापण्यासाठी स्वतंत्र छापखाना आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति छापल्यानंतर त्या सीलबंद करून वितरण हाेईपर्यंत संबंधित १००हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी याच ठिकाणी राहतात, तसेच छपाई झाल्यानंतर सर्वांसाठी हलवा बनविण्याची परंपराही माेडीत काढण्यात आली आहे. 

डिजिटल अर्थसंकल्प
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नाेव्हेंबर, १९४७ सादर झाला हाेता. त्यावेळीही छपाई झाली नव्हती. त्यानंतर, आता प्रथमच छपाई हाेणार नाही. संसदेच्या सर्व सदस्यांना आर्थिक सर्वेक्षण आणि अर्थसंकल्पाच्या डिजिटल प्रति देण्यात येणार आहेत.

Web Title: There is no printing of the budget this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.