Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतिश्रीमंत घटले; जगभरात बसला फटका, मंदीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 06:56 IST

मागील वर्षी भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या ७.५% घटून १२,०६९ वर आली. 

नवी दिल्ली : जगभरातील भू-राजनीतिक अनिश्चितता, आर्थिक मंदीची भीती, व्याजदरातील वाढ, तसेच रुपयातील घसरणीमुळे भारतासह जगभरातील अतिश्रीमंतांच्या संख्येत घट झाली आहे. मागील वर्षी भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या ७.५% घटून १२,०६९ वर आली. 

जगभरात बसला फटका  - २०२२ मध्ये जागतिक पातळीवर अतिश्रीमंतांची संख्या ३.८% घटली. २०२१ मध्ये ती ९.३% वाढली होती. - भू-राजनीतिक अनिश्चितता व मंदीच्या प्रभावामुळे श्रीमंतांच्या संपत्ती उभी करण्याच्या संधीवर परिणाम झाला आहे. - भारतातील अतिश्रीमंत घटले आहे. व्याजदरातील वाढ व रुपयाची घसरण याचा फटकाही त्यांना बसला.

अलीकडे प्रमुख आणि बिगर प्रमुख क्षेत्रांतील घडामोडी गतिमान झाल्यामुळे भारतातील आर्थिक वृद्धीला गती मिळाली. याशिवाय भारत स्टार्टअप कंपन्यांचे जागतिक केंद्र बनल्यामुळे नवीन संपत्ती उभ्या राहत आहेत.        - शिशिर बैजल, चेअरमन तथा प्रबंध     संचालक, नाइट फ्रॅंक इंडिया

शेअर आणि बॉण्ड मार्केटमधील मंदीमुळे जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या संख्येत घट झाली. दुसरीकडे जगातील प्रमुख १०० निवासी बाजारपेठांमध्ये सरासरी ५.२ टक्के आणि आलिशान मालमत्तेच्या गुंतवणुकीत १६ टक्के वाढ झाल्याने अतिश्रीमंताची संख्या फारशी घटली नाही.   - नियाम बेली, प्रमुख संशोधक, नाइट फ्रॅंक 

टॅग्स :बाजारपैसा