Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' भारतीय व्यक्तीकडे तब्बल १६,००० किलोग्रॅम सोने; एका साध्या दुकानातून उभे केले ४५ हजार कोटींचे साम्राज्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:05 IST

Joy Alukkas : एका छोट्या दागिन्यांच्या दुकानापासून सुरू झालेला जॉय अलुक्कासचा प्रवास आता अब्जावधी डॉलर्सच्या जागतिक व्यवसायात फुलला आहे.

Joy Alukkas : केरळमधील त्रिशूरच्या एका छोट्याशा २०० चौरस फुटांच्या दुकानातून सुरू झालेला प्रवास, आज १२ देशांतील १९० पेक्षा जास्त भव्य शोरूम्सपर्यंत पोहोचला आहे. एका सामान्य मुलाने, ज्याच्या वडिलांकडे फक्त एक छोटी ज्वेलरी शॉप होती, आज जगातील सर्वात मोठ्या खाजगी ज्वेलरी चेनपैकी एक असलेल्या 'जॉय अलुक्कास' समूहाची उभारणी केली आहे. मार्च २०२६ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जॉय अलुक्कास यांच्याकडे तब्बल १६,००० किलो सोने साठवलेले आहे!

सोन्याचे भाव १.७५ लाखांच्या पार जाणार?ब्लूमबर्गला दिलेल्या विशेष मुलाखतीत जॉय अलुक्कास यांनी सोने बाजाराबद्दल एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी सोने हेच सर्वात सुरक्षित गुंतवणूक असल्याचे अधोरेखित केले. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव ५,५००-५,६०० डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात, असे भाकीत त्यांनी वर्तवले. दिल्लीत सध्या १.६१ लाख रुपये प्रति १० ग्रॅम असणारे सोने, लवकरच १.७६ लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकते.

१५ भावंडांतील ११ वा मुलगा ते 'गोल्ड किंग'२९ ऑक्टोबर १९५६ रोजी जन्मलेल्या जॉय अलुक्कास यांच्या कुटुंबात १५ भावंडे होती. त्यांचे वडील अलुक्का जोसेफ वर्गीज यांनी १९५६ मध्ये छोट्या ज्वेलरी दुकानातून व्यवसायाची सुरुवात केली होती. जॉय यांनी कमी वयातच शिक्षण सोडून वडिलांना मदत करायला सुरुवात केली. १९८० च्या दशकात त्यांनी घेतलेला एक धाडसी निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

जागतिक विस्ताराचे धाडसी पाऊलत्या काळी भारतीय ज्वेलर्स केवळ कुटुंबापुरते मर्यादित होते. मात्र, जॉय यांनी १९८७ मध्ये अबू धाबीमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय स्टोअर उघडून इतिहास रचला. त्यांनी ज्वेलरी व्यवसायाला ग्लॅमर मिळवून दिले. बॉलीवूड स्टार्सची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती आणि ISO मानांकने मिळवणारी पहिली ज्वेलरी चेन बनून त्यांनी व्यवसायाचा चेहरामोहरा बदलला.

वाचा - महाराष्ट्र अर्थव्यवस्थेत अव्वल! पण विकास दराच्या शर्यतीत 'या' राज्याने मारली बाजी

कोट्यवधींची संपत्तीमार्च २०२६ पर्यंत त्यांची एकूण मालमत्ता सुमारे ४३,००० ते ४५,००० कोटी रुपये (५.२ अब्ज डॉलर्स) इतकी आहे. २०२५ च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये ते २४ व्या क्रमांकावर असून त्यांची मालमत्ता ८८,४३० कोटी इतकी नोंदवली गेली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indian man owns 16,000 kg gold; built $5.2B empire.

Web Summary : Joy Alukkas, starting from a small Kerala shop, built a global jewelry empire. He predicts gold prices will rise amid global tensions, exceeding ₹1.76 lakh per 10 grams. Alukkas's net worth is estimated at $5.2 billion.
टॅग्स :सोनंस्टॉक मार्केटदागिने