Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजार कोसळतोय; काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 12:54 IST

गेल्या काही महिन्यांत सेन्सेक्स ६,८४१ अंकांनी खाली आला आहे. पुढील काही महिन्यांमध्येही शेअर बाजार कोसळेल, असे अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त केले आहेत.

- चंद्रकांत दडस (उपसंपादक)

गेल्या काही सत्रांमध्ये शेअर बाजारात घसरण झाली असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांत सेन्सेक्स ६,८४१ अंकांनी खाली आला आहे. पुढील काही महिन्यांमध्येही शेअर बाजार कोसळेल, असे अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त केले आहेत. अशा कोसळत्या बाजारात आपण काय करायला हवे हे जाणून घेऊ...

शेअर बाजार का कोसळतोय?- जगभरातील अनेक आर्थिक संस्था आणि तज्ज्ञांनी भारतीय शेअर बाजाराला सूज आल्याचे अहवाल दिले आहेत.- अमेरिकेमध्ये ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. यात डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस बाजी मारणार हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत.- शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात नफावसुली करून अनेक गुंतवणूकदार आता पैसे काढून घेत आहेत.- आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही भारतीय बाजारातून कोट्यवधी रुपये बाजारातून काढून घेत असून, ते चिनी बाजारात पैसे गुंतवत आहेत.- रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्ध वाढण्याची भीती आहे.- खासगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांचे तिमाही निकाल नकारात्मक आले आहेत.- डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.

काय करायला हवे?- चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेत राहा.- बाजारातील घसरणीचा फायदा घेत गुंतवणूक सुरूच ठेवा. कंपन्यांचा अभ्यास करून चांगल्या कंपन्या शोधून काढा.- अधिक फायदा दिलेले शेअर्स विका. त्यातून लहान कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा. - दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करून शेअर बाजारातून बाहेर पडू नका. बाजार कितीही खाली आला तरी तो पुन्हा वाढत असतो, हा इतिहास आहे. त्यामुळे घाबरू नका.

टॅग्स :शेअर बाजार