Join us

ई-दुचाकी घेणाऱ्यांना दरवाढीचा ‘शॉक’? फीचर्स घटणार, अनुदान घटल्यामुळे कंपन्या घेऊ शकतात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 11:27 IST

‘फेम-२’ याेजनेत मिळणारे अनुदान घटल्यानंतर ई-वाहन उत्पादक कंपन्या कमी सुविधा असलेल्या दुचाकी बाजारात आणू शकतात.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना झटका मिळू शकताे. ‘फेम-२’ याेजनेत मिळणारे अनुदान घटल्यानंतर ई-वाहन उत्पादक कंपन्या कमी सुविधा असलेल्या दुचाकी बाजारात आणू शकतात. किंमत कमी करण्यासाठी वाहनांमध्ये बदल केला जाऊ शकताे. 

सरकारने इ-दुचाकींवरील ‘फेम-२’ याेजनेतील अनुदान १५ हजार रुपये प्रति किलाेवॅटवरून घटवून १० हजार रुपयांवर आणले आहे. तसेच कमाल अनुदानाची मर्यादाही १५ टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे या दुचाकींमध्ये कमी सुविधा व रेंज राहू शकते. पेट्राेलियम वाहनांसाेबत स्पर्धा करायची असल्यास अनुदान कायम ठेवायला हवे, अशी मागणी ईव्ही क्षेत्रातून केली जात आहे.

किमती वाढणारनवे बदल १ जूनपासून लागू हाेणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमतीत ५ हजार रुपयांपर्यंतची वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमती कमी ठेवण्यासाठी कंपन्या वाहनांमध्ये काही बदल करून मागणी कायम ठेवण्याच्या दृष्टीने उपाययाेजना करण्याच्या तयारीत आहेत.

घटू शकते बॅटरीची क्षमता जून २०२१ मध्ये अनुदान वाढवून १५ हजार रुपये प्रति किलाेवॅट करण्यात आले हाेते. त्यावेळी अनेक कंपन्यांनी बॅटरीचा आकार वाढवून २.५ ते ३ किलाेवॅट एवढी क्षमता केली हाेती. आता अनुदान घटल्यानंतर बहुतांश वाहनांमध्ये कमी क्षमतेच्या बॅटरी लागतील. ही क्षमता १.५ ते २ किलाेवॅट एवढी राहू शकते. 

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर