Join us  

बॉक्स ऑफिसच नाही, शेअर बाजारावरही 'जवान'ची जादू; या कंपनीनं केवळ 2 मिनिटांत कमावले 325 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 2:16 PM

शुक्रवारी केवळ 2 मिनिटांतच कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 325 कोटी रुपयांहूनही अधिकची वाढ झाली.

शाहरुख खानच्याजवान चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसबरोबरच शेअर बाजारवरही दिसून आली. मल्टीप्लेक्स पीव्हीआर आयनॉक्सच्या मार्केट कॅपमध्ये गुरुवारी 35 मिनिटांतच 400 कोटी रुपयांहूनही अधिकची वाढ दिसून आली. तर शुक्रवारी केवळ 2 मिनिटांतच कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 325 कोटी रुपयांहूनही अधिकची वाढ झाली. मात्र, शेअर बाजारात पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ दिसून आली. 

पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमध्ये रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5 टक्क्यांहून अधिक आणि पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या कलेक्शननंतर 7 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र कंपनीच्या शेरने आपल्या गुंतवणूकदारांना नाराज कले. यापूर्वी गदरज-2 च्या वेळीही पीव्हीआर आयनॉक्सच्या शे्रमध्ये चांगली तेजी दिसून आली होती.  

पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरची स्थिती - पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी किरकोळ वाढ दिसून आली आली. सकाळी 10.35 वाजल्याच्या सुमारास कंपनीचा शएअर 0.23 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 1850.8 रुपयांवर पोहोचला होता. तो बाजार सुरू झाल्यानंतर दोन मिनिटांच्या आतच 1879.75 रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला. आज कंपनीचा शेअर 1869 रुपयांवर ओपन झाला होता. एक दिवस आधी कंपनीचा शेअर एक टक्क्याहून अधिकच्या तेजीसह 1846.50 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काही दिवसांत पीव्हीआर आयनॉक्सचा शेअर 2000 रुपयांवर जाऊ शकतो.

दो मिनिटांत 325 कोटींचा फायदा - कंपनीच्या मार्केट कॅपसंदर्भात बोलायचे झाल्यास, केवळ दोन मिनिटांतच कंपनीच्या शेअरमध्ये 325 कोटींहूनही अधिकची वाढ दिसून आली आहे. बीएसईवरील आकडेवारीनुसार, काल शेअरबाजार बंद झाला तेव्हा पीव्हीआर आयनॉक्सचे मार्केट कॅप 18,097.13 कोटी रुपये होते. तर आज, जेव्हा बाजार दोन मिनिटांतच दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला होता, तेव्हा मार्केट कॅप 18423.011 कोटी रुपयांवर गेले होते. याचाच अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये दोन मिनिटांतच 325.87 कोटी रुपयांची वाड झाली होती. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 18,133.89 कोटी रुपये असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपटशेअर बाजारबॉलिवूड